लंडनच्या कोर्टाचा पाकला मोठा झटका; निजामाचा खजिना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

लंडनच्या कोर्टाचा पाकला मोठा झटका; निजामाचा खजिना भारतात येण्याचा मार्ग मोकळा

हैदराबादच्या निजामाची 3 अब्जां 8 कोटींहून अधिक रक्कम लंडनच्या बँकेत जमा आहे. फाळणीनंतर त्यावर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी दावा सांगितल्याने गेली 70 वर्षं खटला सुरू होता. भारताच्या बाजूने निकाल लागला आहे.

  • Share this:

लंडन, 2 ऑक्टोबर : भारत - पाकिस्तानच्या एका वेगळ्या विषयावरच्या कोर्टातल्या लढाईत भारताची सरशी झाली आहे आणि पाकिस्तानला झटका बसला आहे. हैदरबादच्या निजामाच्या तीन अब्जांपेक्षा जास्त संपत्तीच्या हक्कावर दोन्ही देशांनी दावा सांगितला होता. ही कायदेशीर लढाई ब्रिटनमध्ये सुरू होती. लंडनमधल्या हायकोर्टाने या संपत्तीवर भारताचा हक्क असल्याचं मान्य केलं आहे आणि आता हा अब्जावधींचा खजिना भारताच्या हवाली करावा, असा आदेश दिला आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुरू झालेला हा खटला गेली अनेक वर्षं सुरू होता. आता निझामाच्या खजिन्याबाबतचा हा महत्वपूर्ण निर्णय तब्बल 70 वर्षांनी आला आहे. भारताच्या फाळणीपूर्वी हैदराबादच्या निजामाने लंडनच्या बँकेत 10 लाख 7940 पाउंड म्हणजे 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. सध्याच्या मूल्यानुसार ही रक्कम 3 अब्ज 8 कोटींहून अधिक आहे. लंडनमधल्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे न्यायाधीश मार्कस स्मिथ यांनी यावर निर्णय दिला.

वाचा - मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, आदित्य ठाकरेंविरोधात अजूनही कुणी नाही!

फाळणीच्या वेळी हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी पाकिस्तान निर्मितीला मदत म्हणून आपल्या खजिन्यातली रक्कम लंडनच्या बँकेत जमा केली होती. पण त्यावर भारतातल्या निजामाच्या वंशजांना दावा सांगितला आणि प्रकरण कोर्टात गेलं.

वाचा - उदयनराजेंविरोधात लढलेल्या नरेंद्र पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी भूमिका केली स्पष्ट

त्याचा आत्ता निकाल लागला आहे. लंडनच्या कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आता या रकमेवर पाकिस्तानचा काडीमात्र हक्क नाही. निजामाचे वंशज आणि भारत यांचा या संपत्तीवर दावा राहील.

--------------------------------------------------------------------------------------

'इम्रान खान जी' म्हणत दिग्विजय सिंह यांचं हिंदूत्त्वादाबद्दल वादग्रस्त विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या