कॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस

कॉफी बीन्सच्या तेलावर धावणार लंडनमध्ये बसेस

कॉफी बीनच्या निरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं. या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल

  • Share this:

लंडन, 21 नोव्हेंबर: लंडनमधली कॉफी शॉप्स म्हणजे पर्यटकांची आवडती ठिकाणं. पण आता हेच कॉफी आणि लंडनचं नात आता आणखी दृढ होणार आहे कारण कॉफी बीनमधून काढण्यात आलेल्या तेलातून आता लंडनच्या बसेसही धावणार आहेत.

कॉफी बीनच्या निरुपयोगी भागातून काढण्यात आलेलं सहा हजार लीटर तेल काल लंडन बस प्रशासनाकडे पाठवण्यात आलं.  या तेलातून एक बस वर्षभर चालू शकेल. गेले चार वर्ष कॉफी बिनच्या अवशेषातून इंधन बनवण्याचे प्रयत्न सुरु होते . एक लंडनवासी दिवसला जवळपास सव्वा दोन कप कॉफी सहज रिचवतो. याचा अर्थ वर्षाला 2 लाख टन कॉफी वेस्ट तयार होतं. या सगळ्याचा वापर आता इंधन बनवण्यासाठी होऊ शकेल. कॉफी श्रेष्ठ की चहा अशी दोन्हींच्या शौकींनांमध्ये कायमच चढाओढ असते. पण यावेळी मात्र इंधनाच्या मुद्द्यावर कॉफी चहापेक्षा सरस ठरलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 10:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading