Home /News /videsh /

मित्र-मैत्रिणींचा आग्रह पडला महागात, रिकाम्या पोटी मद्यपान केल्यानं तरुणीचा मृत्यू

मित्र-मैत्रिणींचा आग्रह पडला महागात, रिकाम्या पोटी मद्यपान केल्यानं तरुणीचा मृत्यू

रिकाम्या पोटी मद्यपान केल्यानं तरुणीच्या अचानक पोटात दुखायला लागलं आणि प्रकृती खालावली.

    लंडन, 23 जुलै: कधीकधी काही गोष्टी या आपण मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाखातर करतो. त्याच्या परिणामांचा विचार काहीवेळा आपल्या डोक्यात त्यावेळी येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 27 वर्षीय तरुणीची रिकाम्यापोटी मद्यसेवन केल्यानं मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इंग्लंडच्या ब्राइटन शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ही 27 वर्षीय तरुणी फिटनेस फ्रिक होती. तिने आतापर्यंत कधीही मद्यपान केलं नव्हतं आणि मिळालेल्या माहितीनुसार मित्र-मैत्रिणींच्या आग्रहाखातर या तरुणीनं पहिल्यांदाच रिकाम्यापोटी मद्यपान केलं आणि त्यानंतर तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मेट्रोयूकेनं दिलेल्या वृत्तानुसार या तरुणीचा म्हणजेच एलिस बर्टन ब्रैडफोर्ड (Alice Burton Bradford)चा मृत्यू रिकाम्या पोटी मद्यपान केल्यानं झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अल्कोहोलिक केटोएसीडोसिस अशी स्थिती या तरुणीच्या शरीराबाबत होती. यासंदर्भात कदाचित या तरुणीलाही काहीच माहिती नसावी. अशा स्थितीत मद्यपान करणे म्हणजे विष पिण्यासारखंच असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हे वाचा-12 GB RAM आणि 5G! One Plus चा बजेटमधला फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
    हे वाचा-पुण्यात मित्रच झाला मारेकरी, तरुणाचा दगडाने ठेचून केला खून; आरोपी अटकेत या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याआधीच गार्डनमध्ये तिचा मृत्यू झाला. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी अॅलिसने कधीही मद्यपान केलं नव्हतं. ही धावपटू आणि सायकलपटू होती. केवळ मित्रांच्या हट्टामुळे तिने मद्यपान केलं. तिला फक्त चिप्स आणि दारू पिण्यासाठी दिली होती. त्यामुळे तिला पोटदुखी सुरू झाली आणि तिची प्रकृती अचानक खालावली. अॅलिसला रुग्णालयात उपचारासाठी नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून सध्या याची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या