न्यूयॉर्क, 16 एप्रिल : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र असे असले तरी पुढील उपाययोजना म्हणून न्यूयॉर्क (Newyork) राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याबाबत न्यूयॉर्कच्या महापौरांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
न्यूयॉर्कचे महापौर अॅऩ़्ड्र्यू क्युयोमो यांनी आज न्यूयॉर्क राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवित असल्याचे जाहीर केले. सध्या येथील परिस्थिती सुधारत आहे. असे असले तरी आतापर्यंत घेत असलेल्या उपाययोजना यापुढेही घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. मला कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या अधिक कमी झालेली पाहायची आहे. नव्या अपडेटनुसार न्यूयॉर्कमध्ये 606 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे. येत्या काळात उपाययोजनांनी ही संख्या कमी झालेली पाहायची असल्याचे येथील महापौरांनी सांगितले. अमेरिकेत गेल्या काही दिवसात तब्बल 28000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसात हे प्रमाण बरंच कमी झालं आहे. मात्र आताच लॉकडाऊन हटवला तर पुढे रुग्ण संख्या वाढण्याची भीती असल्याचे न्यूयॉर्क या राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क या राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले होते. याशिवाय येथे मृत्यूची संख्याही जास्त होती.
संबंधित -पोलिसात भरती होऊन बापाचा सूड उगवण्याची इच्छा अपूर्ण, त्यापूर्वी मुलीची आत्महत्या
भारताने करून दाखवलं! महाभयंकर कोरोनाला रोखण्यात जगात अव्वल
वक्फ बोर्डाने तयार केली Covid – 19 दफनभूमी, विश्व हिंदू परिषदेकडून विरोध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.