कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा धोका

कोरोना व्हायरसनंतर आता बर्ड फ्लूचा धोका

चीनमधील एका फार्ममध्ये 4500 कोंबड्यांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे

  • Share this:

बीजिंग, 3 फेब्रुवारी : चीनमधील हुनान प्रांतातील कोंबड्यांमध्ये एच5एन1 पसरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हुनान हे ठिकाण हुबईच्या दक्षिणेकडील सीमेजवळ स्थित आहे. तेथे सध्या कोरोना व्हायरसमुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण चीन मॉर्निंग पोस्ट वृत्तपत्रातत चीनच्या कृषी व ग्रामीण परिस्थितीबाबत शनिवारी मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार हे सांगण्यात आलं आहे. फ्लू पसरल्याची माहिती शयोयांग शहरातील शुआनक्विंग जिल्ह्यातील एका फार्मवरुन मिळाली आहे. या फार्ममध्ये 7850 कोंबड्या आहेत आणि 4500 कोंबड्यांचा संसर्ग होऊन मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी संक्रमण परसल्यानंतर 17828 कोंबड्यांना मारण्यात आले.

आतापर्यंत हुनानमध्ये एच5एन1 मुळे कोणताही व्यक्ती संक्रमित झाल्याची माहिती समोर आलेली नाही. चीनमधील अधिकारी कोरोना व्हायरलविरोधात लढत असताना अशा परिस्थितीत एच5एन1 ची भीती निर्माण झाली आहे. चीनमध्ये आतापर्यंत या व्हायरसमुळे 14,380 लोकांना बाधा झाली आहे.  एच5एन1  फ्लू व्हायरलाला बर्ड फ्लूदेखील म्हटले जाते. या आजारामुळे पक्षांना श्वास घेण्याचा गंभीर आजार उद्भवतो.

जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जागतिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत चीनमध्ये 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 हजारहून अधिकांना याची लागण झाली आहे.

चीनचे अध्यक्ष जिनपिंग म्हणाले की, "चीन गंभीर परिस्थितीचा सामना करत आहे पण त्याचवेळी कोरोना विषाणूविरूद्ध चीन ही लढाई जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला." सार्स सारख्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्नांना गती देऊन चीनने येत्या 15 दिवसांत वुहानमध्ये 1300 खाटांचे आणखी एक तात्पुरते रुग्णालय बांधण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2020 08:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading