सिंहिणीला फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या 'वेस्ट अंकल'वरच केला हल्ला

सिंहिणीला फेरफटका मारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या 'वेस्ट अंकल'वरच केला हल्ला

ज्या सिंहिणीचे अंकल वेस्ट यांनी प्राण वाचवले त्यांच्यावरच केला प्राणघातक हल्ला

  • Share this:

जोहान्सबर्ग, 28 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेतील पर्यावरणवादी वेस्ट मॅथ्यूसन यांचा सिंहांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मॅथ्यूसन हे सकाळी सिंह आणि सिंहीण दोघांना घेऊन मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर सिंहिणीनं हल्ला केला. वेस्ट यांच्या पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार मॉर्निग वॉकला निघाल्यानंतर त्या आपली गाडी घेऊन त्यांच्या मागून जात असताना हा संपूर्ण प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं. वेस्ट यांच्या पत्नीनं हल्ला कऱणाऱ्या सिंहिणीचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि सिंहांच्या हल्ल्यात वेस्ट अंकल यांचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

वेस्ट अंकल हे सकाळी दोन सिंहांना घेऊन मॉर्निंग वॉकसाठी निघाले. त्यांच्या मागून काही मिनिटांनी त्यांची पत्नी कार घेऊन बाहेर पडली. यावेळी सिंहिणीनं सिंहाला पाहून संतापली आणि रौद्र रुप धारण केलं. यावेळी त्यांच्यातील लढाई रोखण्याचा वेस्ट अंकल यांनी प्रयत्न केला मात्र सिंहिणीनं सिंहाऐवजी वेस्ट मॅथ्यूसन यांच्यावरच हल्ला केला.

या घटनेनंतर सिंहिणीला एका गेम लॉजमध्ये हलवण्यात आलं आहे. तिथे तिच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर तिला जंगलात सोडायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी या सिंहिणीनं 2017 मध्ये एका व्यक्तीवर हल्ला केला होता आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा देखील जागीच मृत्यू झाला होता.

हे वाचा-गवत खाता खाता गाढवाच्या तोंडात आला साप; काय झालं मग VIDEO पाहा

सिंहिणीच्या हल्ल्याची घटना बुधवारी घडल्याचं वेस्ट यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. ही घटना जोहान्सबर्गपासून 280 किमी दूर असलेल्या सफारी लॉजच्या परिसरात घडल्याचं सांगितलं जात आहे.

वेस्ट मॅथ्यूसन हे अंकल वेस्ट नावानंही ओळखले जातात. सिंहांची शिकार करण्यासाठी डबाबंद शिकार ही पद्धत वापरली जाते. त्यासाठी सिंहांना एका रुममध्ये बंद केलं जातं. या शिकारीपासून अंकल वेस्ट यांनी या सिंहिणीला वाचवलं होतं आणि त्याच सिंहिणीनं त्यांच्यावर हल्ला केल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 28, 2020, 10:08 AM IST
Tags: lion

ताज्या बातम्या