पाहा VIDEO : या 5 जणांच्या भांडणात रेड्याचा झाला फायदा

पाहा VIDEO : या 5 जणांच्या भांडणात रेड्याचा झाला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमधला एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये 5 सिंहांनी एका रेड्यावर शिकारीसाठी झडप घातली होती. हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल... त्यांनी आपलं भक्ष्य वाटून खाल्लं असावं. पण असं काहीच झालं नाही.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमधला एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये 5 सिंहांनी एका रेड्यावर शिकारीसाठी झडप घातली होती. हे वाचल्यावर तुम्हाला वाटेल... त्यांनी आपलं भक्ष्य वाटून खाल्लं असावं. पण असं काहीच झालं नाही. रेड्याची शिकार साधल्यानंतर एक सिंह तिच्यावर तुटून पडला. ते पाहून दुसरा सिंह चांगलाच चवताळला. त्याने त्या सिंहावर हल्ला केला आणि झालं ! या सिंहांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. त्याचा फायदा घेऊन हा रेडा चूपचाप उठला आणि कळपात निघून गेला.

भारतीय वनसेवेतले वरिष्ठ वनाधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आणि त्याखाली लिहिलं, 'या सिंहाना यातून धडा मिळाला असेल. खाण्याच्या ऐवजी भांडण करत बसले आणि भक्ष्य निघून गेलं.

'मावळा छत्रपतींचं मन वळवू शकत नाही' अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

==================================================================================================

VIDEO: अखेर विंग कमांडर अभिनंदन यांची आकाशात भरारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या