मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किनाऱ्याजवळ पोहचण्याआधीच तुटली 120 प्रवासी असलेली बोट, 74 प्रवाशांचा मृत्यू; पाहा LIVE VIDEO

किनाऱ्याजवळ पोहचण्याआधीच तुटली 120 प्रवासी असलेली बोट, 74 प्रवाशांचा मृत्यू; पाहा LIVE VIDEO

संयुक्त राष्ट्राच्या मायग्रंट एजन्सीचे म्हणणे आहे की या घटनेच्या वेळी महिला आणि मुलं यांच्यासह एकूण 120 जण बोटीत होते.

  • Published by:  Priyanka Gawde

लीबिया, 13 नोव्हेंबर : युरोपकडे जाणारी फेरी लीबियाच्या किनाऱ्याजवळ तुटल्यानं कमीतकमी 74 प्रवाशांच्या बुडून मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे 1 ऑक्टोबरपासून या भागात बोट बुडण्याची ही किमान आठवी घटना आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मायग्रंट एजन्सीचे म्हणणे आहे की या घटनेच्या वेळी महिला आणि मुलं यांच्यासह एकूण 120 जण बोटीत होते. ही बोट लीबियातील बंदरगाह अल-खुम्सजवळ बुडाली. आंतरराष्ट्रीय स्थलांतर करणार्‍या संघटनेच्या म्हणण्यानुसार केवळ 47 जणांचा वाचवण्यात यश आले आहे. 2011 मध्ये नाटो समर्थित बंडखोरीनंतर लीबियात स्थिर सरकार नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं स्थलांतर करत असतात.

वाचा-Live सामना सुरू असताना आला कोरोनाचा रिपोर्ट; First Half मध्ये खेळाडू क्वारंटाइन

वाचा-व्लादिमीर पुतिन तिसऱ्या महायुद्धाच्या तयारीत? जगाचा नाश करण्यासाठी तयार बंकर

900 स्थलांतरितांना केला क्रॉसिंगचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनुसार (IOM) किमान 900 स्थलांतरितांनी यावर्षी क्रॉसिंग केले आहे. याव्यतिरिक्त 11,000 स्थलांतरितांना समुद्रात अडविण्यात आले आणि ते लीबियात परत आले. जेथे स्थलांतरितांना बर्‍याचदा ताब्यात घेतले जाते, शोषण केले जाते किंवा अत्याचार केले जातात. आयओएम आणि यूएनची परप्रांतीय संस्था यूएनएचसीआर दोघांचे म्हणणे आहे की स्थलांतरितांच्या परतीसाठी लीबियाला सुरक्षित बंदर मानले जाऊ नये. तसेच, समुद्रात सुटका केलेले किंवा अडकलेल्या प्रवाशांना तिथे पाठवले जाऊ नये.

First published: