आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर विराजमान

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोकणतचे भूमिपूत्र लिओ वराडकर यांची अखेर वर्णी लागलीये. लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2017 11:37 PM IST

आयर्लंडच्या पंतप्रधानपदी मराठमोळे लिओ वराडकर विराजमान

02 जून : आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोकणतचे भूमिपूत्र लिओ वराडकर यांची अखेर वर्णी लागलीये.  लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे.

आयर्लंडच्या पंतप्रधानपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागलाय. लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हीने यांचा पराभव केलाय. लिओ यांना शेवटच्या फेरीत 73 पैकी 51 मतं मिळाली.

लिओ वराडकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वराड या गावचे रहिवासी आहे.

लिओ यांचे वडील अशोक वराडकर 1960 साली भारतातून इंग्लंडला गेले. ते तिथंच स्थायिक झाले. त्यांनी तिथं आयरिश नागरिक असलेल्या मरियमशी लग्न केलं. लिओ यांचा जन्म हा आयर्लंडचा असला तरी त्यांचं मुळगाव हे वराड आहे. वराड गावात त्यांचं घर आहे. वराडकर यांनी आयर्लंड वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रीपद भूषवलं. तसंच ते आरोग्य मंत्री होते. आता त्यांनी सिमोन केव्हीने यांना पराभूत करून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2017 11:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...