मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

धक्कादायक! तलावात पोहोयला गेला; पेनिसमध्ये घुसली जळू आणि...

धक्कादायक! तलावात पोहोयला गेला; पेनिसमध्ये घुसली जळू आणि...

जळू (Leech) हा किडा प्राण्यांचे रक्त शोषून त्यावर जगतो.

जळू (Leech) हा किडा प्राण्यांचे रक्त शोषून त्यावर जगतो.

जळू (Leech) हा किडा प्राण्यांचे रक्त शोषून त्यावर जगतो.

नॉम पेन्ह, 26 जून : जळू (leech) आपल्या त्वचेवर एकदा चिकटली की ती लवकरच त्वचा सोडत नाही. हा किडा प्राण्यांचं रक्त शोषतो, त्यावरच मोठा होता. असा किडा एका व्यक्तीच्या पेनिसमध्ये (penis) घुसला. त्यानंतर त्या व्यक्तीची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही आपण केली नसेल.

ही घटना आहे कंबोडियातील (Cambodia). मिररच्या रिपोर्टनुसार इथली एक व्यक्ती आपल्या घराजवळील तलावात पोहोण्यासाठी गेली. सर्व कपडे काढून ती व्यक्ती पाण्यात उतरली. मात्र असं पाण्यात पोहोणं इतकं महागात पडेल असं त्या व्यक्तीला वाटलंही नव्हतं.

या दिवसानंतर त्या व्यक्तीला तीव्र वेदना होऊ लागल्या. डॉक्टरांकडे जाऊन त्याने आपली तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी एका छोट्या कॅमेराद्वारे त्याच्या शरीराच्या आत डोकावून पाहिलं. तेव्हा मूत्रमार्गातून मूत्राशयाच्या दिशेनं काहीतरी येत असल्याचं दिसलं आणि हे दुसरं तिसरं काही नाही तर जळू होती.

हे वाचा - सावध राहा! TIKTOK चोरतोय तुमचा डाटा; हा VIDEO पाहा

तलावात पोहोताना जळू त्याच्या पेनिसमधून आत गेली, मूत्रमार्गातून मूत्राशयापर्यंत पोहोचली. या व्यक्तीच्य शरीराच्या आतील अवयवांचं रक्त शोषून ती मोठी झाली. जळूने चावून इतर अवयवांनाही हानी पोहोचवली होती. डॉक्टरांनी जळूला बाहेर काढण्याआधी बायपोलर रेस्क्टोस्कोप वापरून शरीराच्या आतच मारलं. यानंतर या व्यक्तीला बरं वाटलं. एक रात्र डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवल्यानंतर या व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.

हे वाचा - फक्त गॅस, हवेच्या मदतीने महिलेने दिला 5 किलो बाळाला जन्म; टाक्यांचीही पडली नाही

दरम्यान पावसाळ्यात पाण्यामध्ये जळूसारखे अनेक किटक असतात. त्यामुळे शक्यतो पूर्ण कपडे काढून असं पाहण्यात पोहू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसंच पोहोल्यानंतर अशा काही वेदना किंवा समस्या जाणवली तर तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचं आवाहनही केलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Insect