Berut Blast : ...आणि 6 भीषण स्फोटानंतर संपूर्ण शहराची घड्याळं पडली बंद, बैरूत स्फोटोचा धक्कादायक VIDEO

Berut Blast : ...आणि 6 भीषण स्फोटानंतर संपूर्ण शहराची घड्याळं पडली बंद, बैरूत स्फोटोचा धक्कादायक VIDEO

इस्त्रायली विश्लेषकांनी असा दावा केला आहे की, बैरूतमध्ये एक नाही तर 43 सेकंदात 6 बॉम्बस्फोट झाले. शेवटच्या 4 बॉम्बस्फोटांनी एका सेकंदापेक्षा कमी वेळ घेतला आणि मोठा धमाका केला.

  • Share this:

बैरूत, 14 ऑगस्ट : लेबननची (Lebanon) राजधानी बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाबाबत (Berut blast) इटली आणि स्पेनमधील तज्ज्ञांनी वेगवेगळे दावे केले आहेत. आता इस्त्रायली विश्लेषकांनी असा दावा केला आहे की, बैरूतमध्ये एक नाही तर 43 सेकंदात 6 बॉम्बस्फोट झाले. शेवटच्या 4 बॉम्बस्फोटांनी एका सेकंदापेक्षा कमी वेळ घेतला आणि मोठा धमाका केला. दुसरीकडे, बैरूतच्या लोकांचे म्हणणे आहे की स्फोट झाल्यापासून त्यांची घरातली घड्याळं बंद आहेत. या प्रकरणात सैन्य हल्ल्याची चौकशी करण्यासाठी अमेरिकेने या तपासात एफबीआयचा समावेश असल्याचेही म्हटले आहे.

रॉयटर्सच्या मते इस्त्रायलने बोअज हेयन यांनी भूकंपशास्त्रीय डेटाच्या मदतीने शोध लावला आहे की बैरूतमध्ये झालेला स्फोट 6 मोठ्या स्फोटांची मालिका होता. हे 6 स्फोट सुमारे 11-11 सेकंदानंतर घडले. शेवटचा स्फोट म्हणजे 4 स्फोटांच्या बरोबरीचा एक होता. यामुळे गोदामात साठवलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. दुसरीकडे, स्फोटांच्या तपासणीत गुंतलेल्या आयआरआयएसने म्हटले आहे की ही केवळ 5 लहान आणि एक अतिशय मोठी स्फोटांची मालिका होती.

बैरूतमध्ये लोकांची घड्याळं पडली बंद

बैरूतमध्ये 4 ऑगस्ट रोजी झालेल्या भयानक स्फोटानंतर लोकांनी घड्याळं बंद झाल्याचे सांगितले आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, शेकडो लोकांनी थांबलेल्या घडाळ्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. या स्फोटात 171 लोक ठार झाले आणि सुमारे 6500 लोक जखमी झाले.

FBI करणार स्फोटाची चौकशी

मेरिकाच्या राजकीय उपसचिव डेव्हिड हेले म्हणाले की,FBI बैरूत हार्बर बॉम्बस्फोटाच्या चौकशीसाठी लेबनन व अन्य आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांनाही सहकार्य करेल. या स्फोटात अनेक लोक ठार आणि जखमी झाले. गुरुवारी बेरूत जवळील बाधित भागाच्या भेटीदरम्यान हेले म्हणाले की, लेबनीज अधिकाऱ्यांच्या आवाहनावर FBI चौकशीत भाग घेईल.

Published by: Priyanka Gawde
First published: August 14, 2020, 11:10 AM IST
Tags: explosion

ताज्या बातम्या