Whatsapp, फेसबुकवर लावला कर; तुघलकी निर्णयानंतर पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची!

Whatsapp, फेसबुकवर लावला कर; तुघलकी निर्णयानंतर पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची!

सोशल मीडियावर कर लावल्यामुळे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागल्याची ही पहिलीच वेळ...

  • Share this:

बैरुत, 30 ऑक्टोबर: whatsapp, फेसबुक मेसेंजरवरील मसेज आणि फोन कॉलवर एखाद्याने कर लावला तर तुम्ही त्याला तुघलकी निर्णय असेच म्हणाल. जर समजा असा निर्णय एखाद्याने घेतला तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहात का? नसाल केला तर काळजी करू नका, कारण असा निर्णय घेतल्यामुळे चक्क एका राजकीय नेत्याला पंतप्रधानपदाची खुर्ची गमवावी लागली आहे. सोशल मीडियावर कर लावल्यामुळे एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागल्याची ही पहिलीच वेळ ठरावी.

लेबेनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी whatsapp, फेसबुक मेसेंजरवरील मसेज आणि फोन कॉलवर कर लागू केले. सरकारने 17 ऑक्टोबरपासून whatsapp, फेसबुक मेसेंजरवरील मसेज आणि फोन कॉलवर कर लावण्याची घोषणा केली होती. ही घोषणा केल्यापासून देशात कर विरोधात आंदोलन सुरु झाले. असा विचित्र कर लागू करण्यामागे सरकारने कारण देखील अजब दिले होते. देश आर्थिक संकटात आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कराची गरज आहे असे हरीरी सरकारचे मत होते.

सरकारने वरील अॅपच्या माध्यमातून फोन केल्यास रोज 0.20 डॉलर टॅक्स द्यावा लागणार होता. भारतीय चलनात ही रक्कम साडे 14 रुपये इतकी होते. लेबेनॉन सरकारच्या या निर्णयाविरुद्ध देशातील जनता रस्त्यावर उतरली. या तुघलकी कराविरुद्ध आंदोलन इतके तीव्र झाले की 12 दिवश देशातील बँका, शाळा, कॉलेज आणि अन्य कार्यलये बंद होती. नागरिकांचा हा विरोध पाहता सरकारने कर मागे घेण्याचा निर्णय घेतला. कर मागे घेण्याच निर्णय घेतल्यानंतर देखील लोकांनी आंदोलन थांबवले नाही. उटल रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांची गर्दी वाढत गेली.

कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांनी पंतप्रधान साद हरीरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कर मागे घेण्याच्या आंदोलनाने आता वेगळे रुप घेतले होते. देशातील भ्रष्ट्राचार, वाढती महागाई आणि मंदीच्या गर्देत सापडलेली अर्थव्यवस्था या विरोधात लोकांनी आंदोलन सुरु केले. या आंदोलना दरम्यान पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अनेक जण जखमी देखील झाले. अखेर मंगळवारी हरीरी यांनी राजीनामा दिला.

या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे देशातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी किंवा अन्य नेहमीचे प्रकार केले नाहीत. तर त्यांनी चक्क रस्त्यावर योग करुन आंदोलन केले. या आंदोलनाला लेबेनॉनमधील फुटीरतावादी गट असलेल्या हिजबुल्लाह गटाचे समर्थन होते.

VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 01:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading