Home /News /videsh /

‘मिस इंग्लंड’चा मुकूट सोडून डॉ. भाषा मुखर्जी लागली कोरोना रुग्णांच्या सेवेला

‘मिस इंग्लंड’चा मुकूट सोडून डॉ. भाषा मुखर्जी लागली कोरोना रुग्णांच्या सेवेला

'डॉक्टर असल्याने सध्याच्या काळात मी स्वस्थ बसू शकत नाही माझी जास्त गरज हॉस्पिटलमध्ये आहे.'

    लंडन 10 एप्रिल : ब्रिटनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलाय. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिस वाढतच आहे. सर्व डॉक्टर्स अहोरात्र मेहनत करत आहेत. अशी परिस्थिती असताना भारतीय वंशाची ‘मिस इंग्लंड’ डॉ. भाषा मुखर्जी हिने आपल्या डोक्यावरचा मुकूट काढून पुन्हा डॉक्टरी पेशात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड टूरवर असलेली भाषा आपला दौरा अर्धवट सोडून ब्रिटनमध्ये परतली असून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचं कामही तिने सुरू केलं आहे. याबाबतचं वृत्त CNNने दिलं आहे. भाषाला 2019चा ‘मिस इंग्लंड’चा किताब मिळाला होता. डॉ. भाषा ही श्वसन विकार तज्ज्ञ आहे. ती लहान असतानाच तिचं कुटुंब कोलकत्याहून ब्रिटनला स्थायिक झालं होतं. त्यानंतर तिचं पूर्ण शिक्षण तिथेच झालं. भाषाने नॉटिंगहम विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. ती आधी बोस्टनच्या पिलग्रिम हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. कोरोनाचा प्रकोप वाढल्यावर तिने पुन्हा आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांवर उपचार करण्याची इच्छा व्यक्त केली आणि तिला परवानगीही मिळाली. डॉक्टर असल्याने या काळात मी स्वस्थ बसू शकत नाही माझी जास्त  गरज हॉस्पिटलमध्ये असल्याची प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली. भाषाच्या या निर्णयाचं सगळ्यांनीच कौतुक केलं आहे. ती श्वसन विकार तज्ज्ञ असल्याने तीचा सध्याच्या काळात जास्त उपयोग होणार आहे. कोरोनाविरुद्ध अमेरिकेला सापडली 10 औषधं? डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा दरम्यान, कोरोनाचा अमेरिकेला प्रचंड मोठा फटका बसला असून कोरोना आटोक्यात येण्याची चिन्हे अजुनतरी दिसत नाहीत. कोरोनाविरुद्ध औषध शोधण्यात अमेरिकेने पूर्ण जोर लावला आहे. अनेक दिग्गज कंपन्या आपली सगळी कामं बाजूला सारून फक्त कोरोनावर औषध शोधण्याचं काम करत आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले, कोरोनाविरुद्ध विविध कंपन्यांनी 10 औषधं तयार केली आहेत. त्या लसींच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. अतिशय वेगात यावर काम सुरू असून शास्त्रज्ञ, उद्योगपती आणि प्रशासन त्यावर युद्धपातळीवर काम करत आहे. लकरच यश मिळेल असंही  ते म्हणाले. सुपरमार्केटमध्ये गेलेल्या महिलेनं 1 लाख रुपये किंमतीचं साहित्य चाटलं आणि... अमेरिकेत अतिशय वाईट स्थिती असून गेल्या 48 तासांमध्ये तब्बल 4000 हजार जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत 4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण असून 14 हजार 700 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या