नवं आश्चर्य : पिसाचा झुकता मनोरा हळूहळू होतोय सरळ

नवं आश्चर्य : पिसाचा झुकता मनोरा हळूहळू होतोय सरळ

जगातल्या ७ आश्चर्यांपैकी एक असणारा पिसाचा झुकता मनोरा गेल्या कित्येक वर्षांपासून एका बाजूला कललेला आहे. आता मात्र तो हळूहळू सरळ होतोय.

  • Share this:

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेली इटलीतील पिसाचा हा देखणा मनोरा बांधल्यानंतर लगेचच एका बाजूने झुकायला लागला. म्हणूनच ते आश्चर्य मानलं गेलं.

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेली इटलीतील पिसाचा हा देखणा मनोरा बांधल्यानंतर लगेचच एका बाजूने झुकायला लागला. म्हणूनच ते आश्चर्य मानलं गेलं.

जगभरातून लाखोच्या संख्येनं लोक या इमारतीला पाहण्यासाठी जात असतात. अनेक वर्षांपासून तिरकी असलेली ही इमारत आता सरळ होत आहे असं एका रिपोर्टमधून सिद्ध झालं आहे.

जगभरातून लाखोच्या संख्येनं लोक या इमारतीला पाहण्यासाठी जात असतात. अनेक वर्षांपासून तिरकी असलेली ही इमारत आता सरळ होत आहे असं एका रिपोर्टमधून सिद्ध झालं आहे.

186 फूट इतकी या मनोऱ्याची उंची आहे. आतापर्यंत 4 सेंटीमीटरपर्यंत हा मनोरा सरळ झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इटलीचं प्रशासन मनोरा पडू नये म्हणून प्रयत्न करत आहे.

186 फूट इतकी या मनोऱ्याची उंची आहे. आतापर्यंत 4 सेंटीमीटरपर्यंत हा मनोरा सरळ झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इटलीचं प्रशासन मनोरा पडू नये म्हणून प्रयत्न करत आहे.

पिसा मनोऱ्याचं बांधकाम सुरू असतानाच एका बाजूला झुकायला सुरुवात झाली होती. 1990 मध्ये इमारत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर हे ठिकाण सामान्यांसाठी बंद करण्यात आलं होतं. तब्बल 11 वर्षांनंतर पिसा पुन्हा सामान्यांसाठी खुलं करण्यात आलं होतं.

सततच्या देखरेखीमुळे या इमारतीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. 12व्या शतकातील मनोऱ्याची जमीन एका बाजूने भुसभुशीत असल्यामुळे इमारतीचे वजन पेलवता आलं नाही आणि मनोरा झुकायला सुरुवात झाली. पिसाचा हा मनोरा नेमका कुणी बांधला याबाबत एकमत नाही. पिसा दियोती साल्वी नावाच्या आर्किटेक्टनं ही इमारत बांधली आहे, असं 2001मध्ये एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.सततच्या देखरेखीमुळे या इमारतीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. 12व्या शतकातील मनोऱ्याची जमीन एका बाजूने भुसभुशीत असल्यामुळे इमारतीचे वजन पेलवता आलं नाही आणि मनोरा झुकायला सुरुवात झाली. पिसाचा हा मनोरा नेमका कुणी बांधला याबाबत एकमत नाही. पिसा दियोती साल्वी नावाच्या आर्किटेक्टनं ही इमारत बांधली आहे, असं 2001मध्ये एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

सततच्या देखरेखीमुळे या इमारतीत बरीच सुधारणा दिसून येत आहे. 12व्या शतकातील मनोऱ्याची जमीन एका बाजूने भुसभुशीत असल्यामुळे इमारतीचे वजन पेलवता आलं नाही आणि मनोरा झुकायला सुरुवात झाली. पिसाचा हा मनोरा नेमका कुणी बांधला याबाबत एकमत नाही. पिसा दियोती साल्वी नावाच्या आर्किटेक्टनं ही इमारत बांधली आहे, असं 2001मध्ये एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 07:47 PM IST

ताज्या बातम्या