'बकरवाल मुस्लिमांना हुसकावण्यासाठी केला सामुहिक बलात्कार' कठुआ बलात्कार प्रकरणातली धक्कादायक माहिती

'बकरवाल मुस्लिमांना हुसकावण्यासाठी केला सामुहिक बलात्कार' कठुआ बलात्कार प्रकरणातली धक्कादायक माहिती

या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यास भडकवल्याचं समजतंय.

  • Share this:

13 एप्रिल : जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण कृत्य करण्यास भडकवल्याचं समजतंय. हे अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवले होतं. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, 'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असत'.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 07:38 AM IST

ताज्या बातम्या