• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • जेव्हा एका भारतीय महिलेने विचारलं पाकिस्तानात टिकली मिळते का? वाचा काय झालं

जेव्हा एका भारतीय महिलेने विचारलं पाकिस्तानात टिकली मिळते का? वाचा काय झालं

सध्या सोशल मीडियावरसुद्धा पाकिस्तानात टिकली मिळते का? याचं चर्चेने जोर धरला आहे.

  • Share this:
मुंबई, 14 जुलै – भारतीय सामाजिक कार्यकर्ती सोनम महाजनने (Sonam Mahajan) एक ट्विट करून एक नवा वाद सोशल मीडियावर सुरू केला आहे. हिंदू महिला (Hindu Women) कपाळावर लावतात ती टिकली (Bindi) पाकिस्तानात मिळते काय याबाबत सोनमने ट्विट केलं आणि त्यामुळे पाकिस्तानातील अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.  मग पाकिस्तानातील बरेच सोशल मीडिया वापरणारे सोनमला समजवून सांगायचा प्रयत्न करायला लागले कि पाकिस्तानात टिकली मिळते. जाणून घेऊया नक्की घडलं काय ते. सोनमनी केलं होतं असं ट्विट सोनम महाजननी तिच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, ‘मला एका पाकिस्तानी पत्रकाराकडू कळलं की इस्लामाबादमध्ये टिकली मिळत नाही. त्यानंतर मी रियाधमध्ये (Riyadh) राहणाऱ्या माझ्या ऐका मैत्रिणीशी बोलले तिनं सांगितलं की तिथं (रियाधमध्ये) सर्व प्रकारच्या टिकल्या मिळतात. आता मला हे समजत नाहीए की पाकिस्तानातील सामाजिक स्थितीवर हसू की तिथल्या कट्टरतेवर आसवं गाळू. ’ सोनम महाजनच्या ट्वीटला अनुषंगून पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी (Pakistani journalist Arzoo Kazmi) यांच्याशी तिच्या झालेल्या संवादाची क्लिप पण शेअर केली आहे. सोनमने पाकिस्तानवर केलेली ही टीका तिथल्या समाजातील सर्व स्तरांतील लोकांना मिरच्या झोंबाव्या तशी झोंबली. मग प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने सोनमला उत्तर देण्याचा सपाटा सुरू केला. (हे वाचा: ' शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवलं, तेव्हा ह्या कुठे होत्या?: तृप्ती देसाई) पाकिस्तानातील एका लेखिकेने (Writer) सोनमच्या ट्विटला उत्तर देताना लिहिलं, ‘ कधी मागणी आणि पुरवठा याबद्दल ऐकलं आहेस का? इस्लामाबादेत कुणीच महिला कपाळावर टिकली लावत नाही. पण तरीही जर तुम्ही व्यवस्थित शोधलं तर तुम्हाला टिकली विकत मिळते. तुमच्या पाकिस्तानी पत्रकार मित्राला याबद्दल माहीत नाही कारण त्यांनी ती कधी शोधलीच नाही.’ (हे वाचा: आमिर खान खरंच कचरा पसरवतो? अभिनेत्यानं दिलं 'हे' उत्तर) आणखी एका युजरने सोनमला उत्तर दिलं. त्याने लिहिलं, ‘ इस्लामाबादमधील जिन्ना मार्केटमध्ये टिकली विकणारे अनेक दुकानदार दिसतील. तिथं अगदी सहज टिकल्या उपलब्ध आहेत. पण सर्रास त्या मिळणार नाहीत कारण इथं टिकली लावणाऱ्या महिलांचं प्रमाण खूप कमी आहे. सिंध प्रांतात हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या आहे तिथं तुम्हाला सर्रास टिकली विकत मिळू शकते.’ पाकिस्तानातील सामाजिक कार्यकर्त्या जलीला हैदर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘ पाकिस्तानात टिकली लावण्याची पद्धत व्यवस्थित रूढ आहे. इतकंच काय ईदच्यादिवशी मुस्लिम मुली पण कपाळावर टिकली लावतात. मला वाटतं की तुम्हाला पाकिस्तानबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे किंवा तुम्ही अनभिज्ञ आहात. मी स्वत: हिंदूंसोबत एकोप्याने वागते, त्यांच्या सणांना जाताना माझ्या कपाळावर टिकली लावते.’
First published: