तुम्ही ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून तर बनवलेलं नाही ना? Video पाहून तुम्हालाही येईल किळस

तुम्ही ब्रेडवर लावताय ते Butter अळ्यांपासून तर बनवलेलं नाही ना? Video पाहून तुम्हालाही येईल किळस

बेल्जिअममध्ये (Belgium) Black soldier fly या विशिष्ट प्रकारच्या कीटकांच्या अळ्यांच्या फॅटपासून (larva fat) बटर तयार करण्यात आलं आहे.

  • Share this:

ब्रुसेल्स, 29 फेब्रुवारी : आपल्यापैकी बहुतेकांचा नाश्ता असतो तो म्हणजे ब्रेड बटर (Bread butter). मात्र तुम्ही तुमच्या ब्रेडवर लावत असलेलं बटर अळ्यांपासून तर बनवलेलं नाही ना, याची आधी खात्री करून घ्या. कारण आता प्राण्यांच्या दुधापासून नव्हे, तर कीटकांच्या अळ्यांपासून (larva) बटर तयार केलं जातं आहे.

बेल्जिअममध्ये (Belgium) असं अळ्यांपासून बटर तयार करण्यात आलं. ज्यापासून तयार केलेले पदार्थ लोकांना खायलाही देण्यात आले. मात्र त्या लोकांना आपण अळ्यांपासून तयार केलेलं बटर खातोय, याची कल्पनाही नव्हती.

घेन्ट युनिव्हर्सिटीच्या (Ghent University) शास्त्रज्ञांनी अळ्य़ांचं फॅट (larva fat) वापरून बटर तयार केलं. त्यासाठी त्यांनी Black soldier fly या विशिष्ट प्रकारच्या कीटकांच्या अळ्यांचा वापर केला. या अळ्यांमध्ये पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवली आणि त्यापासून बटर तयार केलं. हे बटर त्यांनी वॅफल्स,केक आणि कुकिजमध्ये वापरलं.

जेव्हा या पदार्थांमध्ये एक तृतीयांश सामान्य बटरऐवजी अळ्यांपासून तयार करण्यात आलेलं बटर वापरलं, तेव्हा लोकांना त्याबाबत अजिबात समजलं नाही. चवीत काहीच बदल झाला नव्हता. मात्र जेव्हा सामान्य बटर आणि अळ्यांपासून तयार करण्यात आलेलं बटर तेव्हा काही मोजक्या लोकांनाच चव थोडीफार वेगळी लागली.

हेदेखील वाचा - VIDEO पाहून किळस येईल! बिअरच्या ग्लासात पडलेल्या पालीला वाचवण्यासाठी केला कहर

संशोधकांच्या मते, कीटकांपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये प्रोटिन, व्हिटॅमिन्स , फायबर्स आणि मिनरल्स असतात. त्यामुळे हे बटर आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. शिवाय प्राण्यांपासून उत्पादित होणाऱ्या पदार्थांना हा पर्यावरणपूरक आणि स्वस्त असा पर्याय आहे.

संशोधक Daylan Tzompa-Sosa म्हणाले, कीटकांचं फॅट हे बटरपेक्षा वेगळं आहे. यामध्ये ल्युरिक अॅसिड (lauric acid) असतं, पौष्टीक घटक असतात आणि सर्वसामान्य बटरपेक्षा पचनासही चांगलं असतं. ल्युरिक अॅसिड हे अँटिबॅक्टेरिअल, अँटिमायक्रोबिअल आणि अँटिमायकोटिक आहे. ज्यामुळे व्हायरस, बॅक्टेरिया आणि फंगसपासून संरक्षण मिळेल. तुमच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होईल.

First published: February 29, 2020, 6:57 PM IST
Tags: butter

ताज्या बातम्या