मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

दोन वर्षांपासून महिलेचा मृतदेह घरात विचित्र अवस्थेत पडून, तरीही मालक वसूल करत होता भाडं

दोन वर्षांपासून महिलेचा मृतदेह घरात विचित्र अवस्थेत पडून, तरीही मालक वसूल करत होता भाडं

साउथ ईस्ट लंडनमधून (South East London) एक घटना समोर आली, ज्याने लोक आश्चर्यचकित झाले. येथे राहणाऱ्या महिलेचा मृतदेह दोन वर्षांत फ्लॅटमध्ये सुकून गेला (Two Years Old Dead Body Found). सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या काळात घरमालकाने मृतदेहाचे भाडेही वसूल केले.

पुढे वाचा ...
लंडन, 23 जुलै : सध्याच्या जमान्यात वेळेला पैशांचं मोल प्राप्त झालंय. खर्च करण्यासाठी खिशात पैसे आहेत; पण कुटुंबीयांसाठी वेळ काढणं मुश्किल झालंय. जिथे कुटुंबीयांसाठी वेळ नाही, तिथे शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी वेळ कसा मिळणार? लंडनमध्ये (London Weird Incident) नुकतीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेचा मृतदेह दोन वर्षांपासून घरात पडून होता; मात्र त्याबद्दल कोणालाच काही कळलं नाही. आपली एखादी वस्तू सापडली नाही, तर माणूस बेचैन होतो. इथे तर एक व्यक्ती तब्बल दोन वर्षं कोणाच्या नजरेला पडली नाही, तरी त्याबद्दल कोणालाच काही वाटलं नाही. जुन्या काळात शेजाऱ्यांसोबत घरच्यासारखे संबंध असायचे. आता मात्र शेजारी कोण राहतं हेही कित्येकांना माहीत नसतं. कोरोना महामारीनं जगाला आपल्या माणसांच्या सोबत राहायला शिकवलं; पण अजूनही काही जणांना ते समजलं नाहीये. तशीच एक घटना लंडनमध्ये उघडकीला आली आहे. साउथ इस्ट लंडनच्या पेक्खम भागात राहणाऱ्या शीला सेलेवै यांचा मृतदेह (Woman Dead Two Years Back) त्यांच्या घरात जमिनीवर पडलेला आढळून आला. मृतदेह पूर्णपणे सुकून गेला होता. केवळ हाडांचा सांगाडा शिल्लक राहिला होता. कोणा शेजाऱ्यानं पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घरी जाऊन पाहिलं असता महिलेचा मृत्यू झाल्याचं समजलं. शेजाऱ्यांनी सांगितलं, की त्यांनी तिला 2019 पासून पाहिलंच नाही. तिच्या घराचं गॅस कनेक्शनही तोडण्यात आलं होतं. द मिररच्या बातमीनुसार, शीला यांना 2019 नंतर कोणीही पाहिलेलं नाही. दाराच्या बाहेर पत्रांचा ढीग जमा झाला होता. गॅस कनेक्शन तोडलं होतं, तरीही घरभाड्याचे पैसे मात्र मालक वसूल करत होता. शेजाऱ्यानं माहिती दिल्यावर पोलिसांनी दार तोडलं. तेव्हा घरात 61 वर्षांच्या महिलेचा मृतदेह आढळला. आईच्या चहाच्या तलफेमुळे बाळाची भयंकर अवस्था; एक वर्षीय चिमुकल्याची झाली सर्जरी महिलेच्या मृत्यूचं कारण अद्याप कळलेलं नाही. दंत तपासणी केल्यावर तो स्त्रीचा मृतदेह असल्याचं कळू शकलं आहे. घरातल्या फ्रीजची तपासणी केल्यावर त्यातल्या बहुतेक वस्तू 2019च्या दिसल्या. यावरून महिलेचा मृत्यू 2019 मध्येच झाला असेल, असा अंदाज आहे. असं असूनही घरमालक भाडं वसूल (Landlord Kept Taking Rent) करत होता. ऑगस्ट 2019 पासून महिलेचा काहीच पत्ता नसताना मालकानं पोलिसात तक्रार का दिली नाही, याबद्दल पोलीस माहिती घेत आहेत. दोन वर्षांपासून महिला कोणालाही दिसली नाही. तिच्या घराबाहेर पत्रांचा ढीग जमला होता. तरीही शेजाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. यावरून माणसं किती व्यग्र झाली आहेत, हे लक्षात येईल. आपल्या शेजारची एखादी व्यक्ती दिसली नाही, तर चौकशी करण्याचीही गरज कोणाला वाटली नाही, ही सत्य परिस्थिती आहे. समाजातल्या दुरावत चाललेल्या नातेसंबंधांचं हे लक्षण म्हणावं लागेल.
First published:

Tags: Dead body

पुढील बातम्या