मालकाने दिला कामाचा अजब मोबदला! कामगारावर सोडला सिंह आणि...

केलेल्या कामाचा मोबदला मागितला म्हणून अंगावर सिंह सोडल्याचे कोणी तुम्हाला सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 12:59 PM IST

मालकाने दिला कामाचा अजब मोबदला! कामगारावर सोडला सिंह आणि...

लाहोर, 14 ऑक्टोबर: कामाचा मोबदला मागितल्याबद्दल एखाद्या मालकाने नोकराला मारहाण केल्याचे अथवा अन्य काही कठोर शिक्षा केल्याचे तु्म्ही ऐकलं असेल किंवा वाचले असेल. पण केवळ केलेल्या कामाचा मोबदला मागितला म्हणून अंगावर सिंह सोडल्याचे कोणी तुम्हाला सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. एका मालकाने काही रुपयांसाठी केलेला प्रकाराची बातमी आता चर्चेत आली आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताची राजधानी लाहोर येथे धार्मिक स्थळाची देखरेख करणाऱ्या इलेक्ट्रीशियनवर केवळ केलेल्या कामाचा मोबदला मागितला म्हणून पाळलेला सिंह सोडला. या पाळीव सिंहाने गेलेल्या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी झाला आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इलेक्ट्रीशियनवर एका इमामने सिंह सोडला. संबंधित इमामवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी घडल्याचे मीडियाने म्हटले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रीशियन रफीककडून इमाम अली राजा याने धार्मिकस्थळाचे काही काम करून घेतले होते. या कामाचा मोबदला काही दिवसात देऊ असे आश्वासन राजाने दिले होते. केलेल्या कामाचा मोबदला घेण्यासाठी रफीक अनेकवेळा गेला पण त्याला काही पैसे मिळाले नाहीत. असेच एक दिवशी पैसे मागण्यासाठी गेल्यावर राजाने त्याच्यावर पाळलेला सिंह सोडला. वाघाच्या हल्ल्यात रफीकच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली आहे. सिंहाने हल्ला केला तेव्हा रफीकच्या आवाजामुळे काही लोक त्याच्या मदतीला आले आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला.

पोलिसांनी इमामविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर इलेक्ट्रीशियन रफीक अहमदने तक्रार दाखल केली नव्हती. धक्कादायक म्हणजे अली राजाने या घटनेनंतर रफीकला उपचाराचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याने ते दिले नाही. तसेच कामाचा मोबदला देखील दिला नसल्याने या घटनेच्या एक महिन्यानंतर तक्रार केल्याचे रफीकने सांगितले.पाकिस्तानमधील या घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...