पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेश मुशर्रफ यांची फाशी रद्द

पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेश मुशर्रफ यांची फाशी रद्द

सत्तेवरून गेल्यानंतर गेली अनेक वर्ष मुशर्रफ हे विदेशात वास्तव्याला आहेत. ते गंभीर आजारी असून दुबईत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 13 जानेवारी : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा लाहोर हायकोर्टाने रद्द केलीय. त्यामुळे आजारी असलेल्या मुशर्रफ यांना मोठा दिलासा मिळालाय. विशेष न्यायालयाने त्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला मुशर्रफ यांनी लाहोर हायकोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली आणि कोर्टाने हा निर्णय दिला. परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोह प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला सोमवारी नोटिस पाठवली होती. मुशर्रफ यांनी त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांच्याविरुद्धचा खटला आणि इतर कारवाई असंवैधानिक असल्याचं जाहीर करावं अशी मागणी केली होती. तीन सदस्यीय विशेष न्यायालायत देशद्रोहाचा खटल्याचा निर्णय देण्यात आला होता. याआधी उच्च न्यायालयाने विशेष न्यायालायला निर्णय देण्यापासून थांबवण्याचे आदेश दिले होते.

गेल्या दोन वर्षांपासून मुशर्रफ दुबईत वास्तव्य करत आहे. संविधानाचा भंग केल्या प्रकरणी आणि 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल कऱण्यात आला होता. सध्या 76 वर्षांचे असलेले मुशर्रफ दुबईत उपचार घेत आहेत. तब्येतीचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात परतण्यास नकार दिला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 13, 2020, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading