Home /News /videsh /

भाजपबरोबर काँग्रेसनेही केली पाकविरोधी निदर्शनं; 'आप'नेही नोंदवला निषेध

भाजपबरोबर काँग्रेसनेही केली पाकविरोधी निदर्शनं; 'आप'नेही नोंदवला निषेध

पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज सर्वपक्षीय ऐक्य दिसून आलं. शिखांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नानकाना साहिबवर पाकिस्तानात हल्ला झाला, त्याच्या निषेधासाठी भाजप आणि काँग्रेसनं पाक उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं केली.

    नवी दिल्ली, 4 जानेवारी : पाकिस्तानात लाहोरमध्ये असणाऱ्या नानकाना साहिब या शिखांच्या श्रद्धास्थानी हिंसक जमावाने दगडफेक केली. याचा निषेध करण्यासाठी दिल्लीत आज सर्वपक्षीय ऐक्य दिसलं. राजधानीत पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर भाजपने निदर्शनं केली. बॅरिकेड्स तोडून भाजप कार्यकर्ते आतही घुसले. त्याच ठिकाणी युवा काँग्रेसनेही निदर्शनं करून निषेध व्यक्त केला. शिखांच्या धर्मभावना दुखावल्याप्रकरणी पाकिस्तानने गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. लाहोरमध्ये असणाऱ्या नानकाना साहिब या गुरुद्वारात करोडो शिखांच्या धर्मभावना गुंतल्या आहेत. शिखांचे धर्मगुरू गुरुनानक यांचं हे जन्मस्थान मानलं जातं. हेही वाचा - इम्रान खाननी TWEET केला भारतीय पोलिसांच्या अत्याचाराचा Fake VIDEO; UP पोलिसांनी शुक्रवारी हिंसक जमावाने या स्थानावर हल्ला करत जोरदार दगडफेक केली. अजूनही या ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार शीख भक्तांना नगर कीर्तन काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने कडक शब्दात पाकिस्तानला बोल सुनावले आहेत. या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पाकिस्तान सरकार या हल्ल्याला जबाबदार आहे. पाकिस्तानातल्या शीख अनुयायांचं रक्षण करण्याची जबाबदारी तिथल्या सरकारची आहे, असं रणजीतसिंह सूरजेवाला यांनी केलेल्या Tweet मध्ये म्हटलं आहे. ---------------------- अन्य बातम्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा 'बाहुबली' जनरल ठार CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य चक्क सूर्य बोलल्याचा दावा, किरण बेदींनी शेअर केलेल्या VIDEO ची देशभर चर्चा तो VIDEO VIRAL झाल्यानंतर पोप फ्रान्सिस यांनी मागितली माफी
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Gurudwara, Lahore, Pakistan

    पुढील बातम्या