इम्रान खान यांचं पंतप्रधानपद अपात्र ठरवणारी याचिका लाहोर हायकोर्टात दाखल

इम्रान खान यांचं पंतप्रधानपद अपात्र ठरवणारी याचिका लाहोर हायकोर्टात दाखल

इम्रान खान यांनी निवडणुकीचा उमेदावारी अर्ज भरताना आपल्या कुटुंबीयांबदद्लची खोटी माहिती दिली,असा आरोप करणारी एक याचिका लाहोर हायकोर्टानं दाखल करून घेतली आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 9 मार्च : इम्रान खान यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना आपल्या कुटुंबीयांबदद्लची खोटी माहिती दिली,असा आरोप करणारी एक याचिका लाहोर हायकोर्टानं दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर 11 मार्चला सुनावणी होणार आहे.

इम्रान यांना तायरिया जाडे खान नावाची एक मुलगी आहे आणि तिची माहिती इम्रान खान यांनी लपवून ठेवली, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तायरिया अॅना लुइसा व्हाइट आणि लॉर्ड गॉर्डन व्हाइट यांची मुलगी आहे.पण ती इम्रान खान यांची मुलगी आहे,असं बोललं जातं.

इम्रान खान यांनी आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांमध्ये तायरियाचं नाव लिहिलं नव्हतं.उमेदवारी अर्ज भरताना खोटी माहिती दिली तर ती व्यक्ती पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरते, असं या याचिकेत म्हटलं आहे.

अशा कोणत्या कारणामुळे सोनिया गांधी राजकारण सोडू शकल्या नाहीत ?

याच मुद्यावरून इम्रान खान यांचं पंतप्रधानपद अपात्र ठरवा, अशी मागणी करणारी याचिका इस्लामाबाद कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण इम्रान खान यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे,असं म्हणत कोर्टाने ही याचिका दाखल करून घ्यायला नकार दिला होता.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक- ए - इन्साफ या पक्षाला 2018 च्या निवडणुकीत बहुमत मिळालं आणि त्यानंतर ते पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने हल्ला केला. त्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका केल्यामुळे इम्रान खान यांची प्रशंसा झाली. पण त्याचबरोबर याच कृतीमुळे पाकिस्तानात त्यांना विरोधाचाही सामना करावा लागला.आता या याचिकेमुळे त्यांचं पंतप्रधानपद पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

======================================================================================

First published: March 9, 2019, 7:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading