Home /News /videsh /

सीटसाठी मायलेकीचा जोरदार हंगामा, एक तास खोळंबलं विमानाचं उड्डाण

सीटसाठी मायलेकीचा जोरदार हंगामा, एक तास खोळंबलं विमानाचं उड्डाण

एका विमानात (passenger plane) आपल्याला हवी असणारी सीट रिकामी करावी, यासाठी एक तरुणी आणि तिच्या आईनं (lady and her mother) अक्षरशः गोंधळ घातला.

    न्यूयॉर्क, 11 ऑगस्ट : एखाद्या सीटवरून (Seat) प्रवाशांमध्ये भांडणं आणि वादावादी (quarrel and debate) होण्याचे प्रकार आपण अनेकदा पाहतो. मात्र हे प्रकार साधारणतः बस, लोकल, रिक्षा, मेट्रो वगैरे सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासादरम्यान घडतात. अनेकदा रिझर्व्हेशनचा घोळ होतो, तर अनेकदा एखादी सीट पहिल्यांदा कुणी पकडली यावरून वाद होतात. मात्र आता असा वाद बस किंवा ट्रेनमध्ये नाही, तर विमानात (flight) घडल्याची घटना समोर आली आहे. एका विमानात (passenger plane) आपल्याला हवी असणारी सीट रिकामी करावी, यासाठी एक तरुणी आणि तिच्या आईनं (lady and her mother) अक्षरशः गोंधळ घातला. अमेरिकेच्या साउथवेस्ट एअरलाईन्सच्या विमानात हा प्रकार घडला. ‘द मिरर’नं दिलेल्या वृत्तानुसार प्रवाशांनी जवळपास खचाखच भरलेल्या एका विमानात एक तरुणी आणि तिच्या आईने प्रवेश केला. आतमध्ये आल्यानंतर जवळपास सर्व सीट भरल्या असून आपल्याला हवी ती सीट उपलब्ध नसल्याचं पाहून त्यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला. त्यांनी एका प्रवाशाला गाठलं आणि त्याला तिथून उठायला सांगितलं. विमानात रिझर्व्हेशन नसल्यामुळे आणि फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्हचा नियम असल्यामुळे त्या प्रवाशाने जागेवरून उठायला नकार दिला. त्यानंतर या मायलेकीनं जोरदार गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांचा गोंधळ ऐकून कॅबिन क्रू मेंबर्स  बाहेर आले. त्यातील काहीजणांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघीही इरेला पेटल्या होत्या आणि काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या. विमानात एकदा एखाद्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना कुठल्याही कारणास्तव आपण उठवू शकत नसल्याचं विमानातील क्रू मेंबर्सनी त्यांना सांगितलं. मात्र त्या काहीही ऐकायच्या अवस्थेत नव्हत्या. या भांडणामुळे वैमानिकाला टेकऑफ घेणे शक्य होत नव्हते. सुमारे तासभर हे भांडण सुरू होतं. या मायलेकींमुळे इतर प्रवाशांचा एक तास वाया गेला आणि विमान धावपट्टीवरच थांबून राहिलं. अखेर क्रू मेंबर्सनी या मायलेकींना विमानातून खाली उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आलं आणि सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडत टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Airplane, America

    पुढील बातम्या