कुवेत, 18 जानेवारी: एकेकाळी तेलाच्या व्यापारातील (Oil Business) अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असणाऱ्या कुवैतची (Kuwait) अवस्था सध्या फारच बिकट झालीय. जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) या देशावर असा काही परिणाम होऊ लागला आहे की इथं जगणंदेखील (Unlivable) अशक्य झालं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या देशातील तापमानात कमालीची वाढ होत असून उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडणंही नागरिकांना शक्य होत नाही.विक्रमी तापमानजगातील सर्वात उष्ण देश असा कुवैतचा लौकीक आहेच. मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे हा आता अतिउष्ण देश बनला आहे. 2016 साली इथं तब्बल 54 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. आतापर्यंत पृथ्वीवर नोंदवण्यात आलेलं हे सर्वोच्च तापमान आहे. गेल्या 76 वर्षातील हे सर्वाधिक तापमान असल्याचं सांगितलं जातं. गेल्या वर्षी तर जून महिन्यातच कुवैतमधील तापमान 50 अंशांच्या वर पोहोचलं होतं. 2071 मध्ये येणार मोठं संकटदर वर्षी थोड्या थोड्या प्रमाणात या देशातील तापमान वाढत चाललं असून 2071 ते 2100 साल येईपर्यंत तापमानात आणखी 4.5 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. म्हणजेच हे तापमान 58 अंशांच्याही वर जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तिथं मानवी वस्ती टिकणंच शक्य नसल्याचं सांगितलं जात आहे. एकेकाळी वैभव पाहिलेल्या या देशातून आता नागरिकांनी स्थलांतर सुरू केलं असून दरवर्षी नागरिक इतर देशांमध्ये आसरा घेत असल्याचं दिसून येत आहे.
हे वाचा -
प्राणीसृष्टी नष्टकुवैतमध्ये सध्या रस्तोरस्ती मरून पडलेले पक्षी आणि प्राणी दिसत आहेत. कमालीच्या उष्णतेचा प्राण्यांना त्रास होत असून प्राणीसृष्टी नष्ट होऊ लागल्याचं हे लक्षण आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडणाऱ्या अनेकांचा उष्णाघातामुळे मृत्यू झाल्याच्या घटना वाढत आहेत. एकीकडे तापमान थंड ठेवण्यासाठी घरोघरी एसीचा वापर केला जात आहे. त्यामुळे हवेचं प्रदूषण आणि उष्णता अधिकच वाढतच असून जगणं बिकट झालं आहे.
Published by:desk news
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.