ख्रिसमसला कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीसोबत होणार भेट, पाकने दिली परवानगी

ख्रिसमसला कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीसोबत होणार भेट, पाकने दिली परवानगी

येत्या 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई भेट घेणार आहे.

  • Share this:

08 डिसेंबर : पाकिस्तानच्या जेलमध्ये कैद असलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अखेर पाकिस्तानने परवानगी दिलीये. येत्या 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आई भेट घेणार आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयातील प्रवक्ते डाॅ. मोहम्मद फैजल यांनी शुक्रवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना भेटता येणार अशी माहिती दिली.  या भेटीच्या वेळी भारतीय दुतावासातील सदस्यही उपस्थितीत असणार आहे.

कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप केलाय. या आरोपाअंतर्गत त्यांना बलूचिस्तानमधून 3 मार्च 2016 ला अटक केली होती. तेव्हापासून कुलभूषण जाधव पाकच्या जेलमध्ये आहे.

10 नोव्हेंबरला पाकिस्तानने जाधव यांना पत्नीला मानवतेच्या दृष्टीकोनातून भेटण्यासाठी परवानगी दिली होती पण आईच्या भेटीबद्दल कोणताही निर्णय पाकने घेतला नव्हता. अखेर आज त्यांनी पत्नी आणि आईला भेटण्यासाठी परवानगी दिलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2017 09:34 PM IST

ताज्या बातम्या