15 मे : हेरगिरीची कबुली देणारा कुलभूषण जाधव यांचा पाकिस्ताननं दिलेला व्हिडिओ पहायला हेगच्या कोर्टाने नकार देत पाकिस्तानला दणका दिला.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आजची सुनावणी संपलीये. भारताकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे बाजू मांडली. कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्याचं भारतानं अपील केलं.
आज दोन्ही देशांच्या बाजूनं युक्तीवाद सादर करण्यात आला. दोन्ही देशांना प्रत्येकी 90 मिनिटं देण्यात आली. पंधरा न्यायधीशांच्या समोर दोन्ही देशांनी युक्तीवाद सादर केला. कुलभूषण जाधव यांचा जीव धोक्यात असून पाकिस्ताननं फर्मावलेल्या फाशीला कायमची स्थगिती द्यावी अशी मागणी भारतानं केली तर ह्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताने येणं हा खोडकरपणा असल्याचा युक्तीवाद पाकिस्तानने केला.
कुलभूषण जाधव यांचं इराणमध्ये अपहरण झालं असा दावा भारताने केला तर पाकिस्ताने हा दावा फेटाळत कुलभूषण यांनी बलुचिस्तानमधून अटक करण्यात आली असा युक्तिवाद केला. एवढंच नाहीतर कुलभूषण हेर असून त्यांच्या मुस्लिम नावानं पासपोर्ट असल्याचंही सांगितलं. तर कुलभूषण जाधव यांना वकिल न देऊन हक्काचं उल्लंघन केलं असा दावा केला. तसंच सुनावणीपूर्वीच कुलभूषण यांना फाशी देण्याची भीतीही भारताने व्यक्त केली.
नेमकं काय घडलं हेगच्या कोर्टात?
भारत - बाजू मांडायला 90 मिनिटं मिळाली
पाकिस्तान - बाजू मांडायला 90 मिनिटं मिळाली
भारत- कुलभूषण जाधवचं इराणमध्ये अपह्रण
पाकिस्तान-बलुचिस्तानमध्ये हेरगिरी करताना अटक
भारत-कुलभूषण हेर असेल तर भारतीय पासपोर्ट कसा असेल?
पाकिस्तान- कुलभूषण हेर आहे आणि मुस्लिम नावानं पासपोर्ट
भारत- जाधवना वकिल देऊ दिला नाही, हक्काचं उल्लंघन
पाकिस्तान-भारताला एफआयआरची कॉपी पाठवली
भारत- हा जाधव आणि भारताच्या हक्काचं उल्लंघन
पाकिस्तान- हेगमध्ये खटला म्हणजे भारताचं राजकीय नाटक
भारत- कुलभूषण यांच्या फाशीवर कायमची स्थगिती द्या
पाकिस्तान-कुलभूषण जाधवचा फेक व्हिडिओ पहायला कोर्टाचा नकार
भारत- सुनावणीपूर्वीच कुलभूषणना फाशी देण्याची भीती
पाकिस्तान-कुलभूषण जाधव यांच्याकडे अपीलासाठी 150 दिवस