22 महिन्यांनंतर 40 मिनिटं कुलभूषण जाधव भेटले आई आणि पत्नीला!

22 महिन्यांनंतर 40 मिनिटं कुलभूषण जाधव भेटले आई आणि पत्नीला!

पाकिस्तान सरकारने फक्त अर्धा तास भेटायची परवानगी या दोघींना दिली. या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

  • Share this:

25 डिसेंबर: तब्बल 22 महिन्यांनंतर कुलभूषण जाधव आपल्या आईला आणि पत्नीला भेटले. पाकिस्तान सरकारने फक्त अर्धा तास भेटायची परवानगी या दोघींना दिली.नंतर ही भेट 40 मिनिटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.  या भेटीनंतर कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. ही भेट गळाभेट नसून दोघांमध्ये काचेच्या भिंतीतून भेट झाली आहे

बलुचिस्तान प्रांतात गुप्तहेर आणि दहशतवादी हालचाली करण्यावरच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती. तर त्यांचा या साऱ्याशी काही संबंध नसून ते इराणमध्ये व्यापार करत होते अशी भारताची भूमिका आहे . पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारताने  आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.  हा खटला आता आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू आहे.

लभूषण जाधव यांची आई आणि पत्नी आज सकाळी इस्लामाबादला विमानाने गेल्या.  आज संध्याकाळी त्या पुन्हा भारतात परतणार आहेत.त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे काही अधिकारीही आहेत.  या भेटीवर लवकरच परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 02:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading