भारत-नेपाळ तणावादरम्यान केपी शर्मा ओलींनी केला पंतप्रधान मोदींना फोन...

भारत-नेपाळ तणावादरम्यान केपी शर्मा ओलींनी केला पंतप्रधान मोदींना फोन...

काही दिवसांपूर्वी केपी शर्मा यांनी राम जन्मभूमीबाबत वक्तव्य केलं होत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : सीमा विवाद आणि राम मंदिर जन्मभूमी, अयोध्याबाबत वक्तव्यांमुळे वाढणाऱ्या तणावादरम्यान नेपाळ (Nepal) चे पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याशी बातचीत केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानुसार केपी शर्मा ओली यांनी संवादादरम्यान भारताच्या 74 व्या स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. केपी ओली यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या गैर-स्थायी सदस्याच्या रुपात भारताला शुभेच्छा दिल्या.

केपी ओली यांनी भारताचे पंतप्रधान यांना अशावेळी शुभेच्छा दिल्या तेव्हा दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण सुरू आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये झालेल्या बातचीत दरम्यान कोविड-19 (COVID-19) महासाथीचा प्रभाव कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसदर्भात एकजुटता व्यक्त केली. पीएम मोदींनी याप्रकरणात नेपाळला भारताचे समर्थन असल्याचे सांगितले आहे.

17 ऑगस्ट रोजी होणार दोन्ही देशांमध्ये बातचीत

सांगितले जात आहे की नेपाळदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. हा वाद संपविण्यासाठी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी 17 ऑगस्ट रोजी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये बैठक करणारे होते. या बैठकीत नेपाळकडून परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी सहभागी होती तर भारताकडून नेपाळमध्ये भारताचे राजदूत विनय क्वाटरा होतील.

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या