कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं 'किंगफिशर 2018 कॅलेंडर' केलं रिलीज!

कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं 'किंगफिशर 2018 कॅलेंडर' केलं रिलीज!

विजय मल्ल्याला जेरबंद करण्यासाठी भारतीय तपासयंत्रणा आजही प्रयत्नशील आहेत. मात्र याची जराशीही तमा न बाळगता विजय मल्ल्यानं वर्ष 2018चं किंगफिशर कॅलेंडर लोकांसमोर आणायची तयारी पूर्ण केली आहे.

  • Share this:

18 जानेवारी : विजय मल्ल्याला जेरबंद करण्यासाठी भारतीय तपासयंत्रणा आजही प्रयत्नशील आहेत. मात्र याची जराशीही तमा न बाळगता विजय मल्ल्यानं वर्ष 2018चं किंगफिशर कॅलेंडर लोकांसमोर आणायची तयारी पूर्ण केली आहे. मल्ल्याने स्वतः त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून मॉडेल डायरिज शेअर करून या कॅलेंडरची झलक दाखवून दिली आहे.

फेसाळलेले समुद्रकिनारे, चकचकीत माहौल आणि बिकिनी घालून पोज देण्यासाठी आसुसलेल्या मॉडेल्स...यु गेस्ड इट राईट, किंग ऑफ गुड टाईम इज बॅक!

भारतातील तपास यंत्रणा ज्याला जेरबंद करण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करून थकल्या आणि 9000 कोटींच्या कर्जवसुलीसाठी बँका जेरीस आल्या त्या विजय मल्ल्यानं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून 2018 सालच्या त्याच्या कॅलेंडरची पहिली झलक शेअर केली आहे.

मॉडेलिंग इंडस्ट्रीतल्या अनेक तरुणी यावेळीही या कॅलेंडरवर झळकण्यासाठी आतुर आहेत. त्यांनी स्वतः या व्हिडिओंमधून तशी कबुलीही दिली आहे. तर आघाडीचा फोटोग्राफर अतुल कसबेकरनं 2018चं किंगफिशर कॅलेंडर शूट केलं आहे. यंदा या कॅलेंडर शूटसाठी कॉर्सिका या देशातील समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. भारत आणि परदेशातील अनेक मॉडेल्स यंदा या कॅलेंडरवर झळकणार आहेत.

एखादा माणूस कर्जबाजारी झाला तर आपल्या अनावश्यक खर्चांना तो कात्री लावण्याचा विचार करतो. मात्र मल्ल्या शेठ तेवढा सुज्ञपणा दाखवायला काही तयार नाही आहे. जी जीवनशैली तो आजपर्यंत जगला तीच पुढेही चालू ठेवण्यावर तो ठाम आहे. त्यामुळे ज्या बँकांचे म्हणजेच पर्यायानं सर्वसामान्य माणसांचे पैसे बुडवून हा सगळा दौलतजादा सुरू आहे. त्यांना हा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नाही. पण मंडळी ही तर फक्त किंगफिशर कॅलेंडर 2018ची झलक आहे. अजून संपूर्ण कॅलेंडर रिलीज होणं बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2018 02:34 PM IST

ताज्या बातम्या