मराठी बातम्या /बातम्या /विदेश /या देशात मुलींना करावी लागते 'टॉपलेस परेड', 15 बायका असलेल्या लहरी राजाचा फतवा

या देशात मुलींना करावी लागते 'टॉपलेस परेड', 15 बायका असलेल्या लहरी राजाचा फतवा

दरवर्षी टॉपलेस मुलींची प्रदर्शनार्थ परेड आयोजित केली जाते. त्यातून राजा स्वत:साठी नवीन बायको निवडतो. विशेष म्हणजे परेडमध्ये भाग न घेणार्‍या मुलींना शिक्षाही दिली जाते.

दरवर्षी टॉपलेस मुलींची प्रदर्शनार्थ परेड आयोजित केली जाते. त्यातून राजा स्वत:साठी नवीन बायको निवडतो. विशेष म्हणजे परेडमध्ये भाग न घेणार्‍या मुलींना शिक्षाही दिली जाते.

दरवर्षी टॉपलेस मुलींची प्रदर्शनार्थ परेड आयोजित केली जाते. त्यातून राजा स्वत:साठी नवीन बायको निवडतो. विशेष म्हणजे परेडमध्ये भाग न घेणार्‍या मुलींना शिक्षाही दिली जाते.

नवी दिल्ली, 28 मे : आफ्रिका खंडातला स्वाझीलँड (Swaziland) हा देश तेथील विचित्र कायद्यांसाठी ओळखला जातो. परंतु, तीन वर्षांपूर्वी तिथे अशी बाब घडून आली ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. एप्रिल 2018 मध्ये इथल्या राजाने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि आपल्या देशाचं नाव बदललं. आता या देशाला स्वाझीलँडऐवजी 'किंग्डम ऑफ इस्वातिनी' (The Kingdom Of eSwatini) असं नाव देण्यात आलं आहे. इस्वातिनी म्हणजे 'स्वाझींची भूमी'.

स्वाझीलँडचा राजा इस्वातिनी याच्याकडं 1434 कोटींची संपत्ती आहे. या राजाचं स्वतःचं जेट विमान आणि खासगी विमानतळही आहे. हा राजा अतिशय मनमौजी आणि लहरी म्हणून ओळखला जातो. या राजानं स्वतःला अनेक विवाह करण्याचे स्वातंत्र्य असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच इथल्या नागरिकांनाही अनेक विवाह करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग काय? या परंपरेचा राजानं पुरेपूर फायदा घेतला आणि एकामागून एक 15 लग्नं केली. स्वाझीलँड केवळ याच कारणामुळं नव्हे तर इतर बर्‍याच कारणांमुळे कुख्यात आहे.

आपल्या पत्नींचं मन राखण्यासाठी राजानं त्याच्या कोषामधून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून त्या सर्वांना 15 रोल्स रॉयस गाड्या भेट दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर, त्याने बीएमडब्ल्यू गाड्याही खरेदी केल्या. गेल्या वर्षी वाढदिवशी आपल्या देशाचे नाव बदलणार्‍या किंग इस्वातिनी नवीन विवाहही केले. सध्या 15 बायका असलेला हा राजा आणखीही लग्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी राजानं एक अजब प्रथा सुरू केली आहे.

स्वाझीलँडमध्ये दरवर्षी टॉपलेस मुलींची प्रदर्शनार्थ परेड आयोजित केली जाते. त्यातून राजा स्वत:साठी नवीन पत्नी निवडतो. विशेष म्हणजे परेडमध्ये भाग न घेणार्‍या मुलींना शिक्षाही दिली जाते.

हे वाचा - कोरोनाविरोधातील लढ्यात गेम चेंजर ठरणार Nasal Spray? 99.99 टक्के प्रभावी असल्याचा दावा

सध्याच्या काळात कोणत्याही देशाचं थेट नाव बदलणं हा एक अत्यंत विचित्र प्रकार आहे. जगातील सर्वांत गरीब देशांच्या यादीत असलेल्या स्वाझीलँडमध्ये संपूर्णपणे राजेशाही आहे. आजही राजा आणि प्रजा अशी व्यवस्था असलेले हे आफ्रिकेतील शेवटचे साम्राज्य आहे.

First published:
top videos

    Tags: South africa