• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • किम जोंग उन यांच्यापेक्षाही भयंकर त्यांची बहिण, गोळ्या घालून वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्याचे आदेश

किम जोंग उन यांच्यापेक्षाही भयंकर त्यांची बहिण, गोळ्या घालून वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करण्याचे आदेश

नेमकं कोणत्या अधिकाऱ्याला मारण्यात आलं आहे, याची कल्पना त्यांना नाही; मात्र किम यो जोंगच्या आदेशाने ही हत्या झाल्याचं त्यांना समजलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

  • Share this:
प्योंगयांग, 26 मे: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या क्रूरतेचे किस्से जगभरात चर्चिले जातात. दरम्यान त्यांची बहीण किम यो जोंग (Kim Yo Jong) या देखील त्यांच्या सारख्याच क्रूर आहेत. अलीकडेच त्यांच्या आदेशावरून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचं वृत्त आहे. सत्तेत असलेल्या सेंट्रल पार्टीविरोधात कृत्यं करण्याच्या संशयावरून या अधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचं समजतं. नवभारत टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सरकारी यंत्रणांमध्ये सरकारविरोधी कारवाया करणाऱ्यांना शोधून, त्यांचा खात्मा करण्याचं किम यो जोंगने ठरवलं आहे. त्यामुळे असा काही संशय आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना थेट मारूनच टाकण्याचे आदेश त्यांच्याकडून दिले जातात. रेडियो फ्री एशियाने उत्तर कोरियाच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे, की प्योंगयांग या राजधानीच्या शहरात एका वरिष्ठ अधिकाऱ्याला गोळ्या घालण्यात आल्याच्या वृत्ताची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. नेमकं कोणत्या अधिकाऱ्याला मारण्यात आलं आहे, याची कल्पना त्यांना नाही; मात्र किम यो जोंगच्या आदेशाने ही हत्या झाल्याचं त्यांना समजलं आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 10 अधिकाऱ्यांवर झाडल्या गोळ्या गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोन्याच्या तस्करीबद्दल सेंट्रल पार्टीला (Central Party) माहिती देण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात देशाच्या सीमा सुरक्षा दलाच्या (Border Security Forces) 10 सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शरीरांची गोळ्यांनी अक्षरशः चाळण करण्यात आली होती. त्या व्यतिरिक्त नऊ अधिकाऱ्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सत्तेला आव्हान देणाऱ्या व्यक्तींचा शोध किम यो जोंग यांनी सुरू केला आहे. हे वाचा-मुलाने पॉर्न पाहिला तर North Korea चा हुकूमशहा भडकला; कुटुंबाला दिली शिक्षा आपला भाऊ आणि उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन यांनाही त्यांच्या बहिणीने याबद्दल सांगितलं आहे. पक्षाच्या, सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या किंवा तसा संशय ज्यांच्याबद्दल आहे, त्यांना थेट ठार करण्यात आलं आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे किम यो जोंग विरोधातलं वातावरण वाढत असल्याचीही माहिती आहे. किम यो जोंगने दिलेल्या आदेशांनुसार सेंट्रल पार्टीकडून रयांगगांग प्रांतातल्या सगळ्याच अधिकाऱ्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे विरोधी गटातल्या व्यक्तींचा पत्ता लागू शकेल. अनेक लोकांना राजकीय कैद्यांसाठी तयार करण्यात आलेल्या तुरुंगांमध्ये टाकण्यात आलं आहे. रेडियो फ्री एशियाच्या हवाल्याने डेली मेलने दिलेल्या वृत्तात असं म्हटलं आहे, की कोरोनासंदर्भातले नियम पाळण्यासाठी लोकांना भीती बसायला हवी म्हणून 28 नोव्हेंबर रोजी किम जोंग उन यांच्या आदेशावरून एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या मारून ठार करण्यात आलं. त्याला चीनमधून सामानाची तस्करी करत असताना पकडण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने देशाच्या सीमाबंद ठेवलेल्या असतानाही हे कृत्य करत असताना ती व्यक्ती पकडली गेली होती. हे वाचा-कार्यकर्तीचा दावा: कोरोना काळातही किम जोंग उन होते 2000 सेक्स स्लेव्ह्जबरोबर दरम्यान, एक्स्प्रेस को डॉट यूकेने असं वृत्त दिलं आहे, की किम जोंग उन यांची पत्नीरी सोल-जू गेल्या वर्षभरापासून बेपत्ता आहे. 25 जानेवारी 2020 रोजी त्या एका सार्वजनिक कार्यक्रमात शेवटच्या दिसल्या होत्या. री सोल-जू यांना एकट्याने कुठेही जाण्याची परवानगी नसते. त्यामुळेच त्यांना त्यांच्या पतीनेच गायब केलं असावं,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
First published: