सस्पेन्स संपला! 21 दिवसांनंतर जगासमोर आले किम जोंग उन, पाहा PHOTO

सस्पेन्स संपला! 21 दिवसांनंतर जगासमोर आले किम जोंग उन, पाहा PHOTO

गेल्या काही दिवसांपासून किम जोंग कुठे आहेत याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या. या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला तरी 21 दिवस ते कुठे होते हा प्रश्न उद्यापही अनुत्तरीत आहे.

  • Share this:

प्योंगयांग, 02 मे : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) गेल्या काही दिवसांपासून गायब झाले होते. त्यांबाबत अनेक वावड्या उठल्या होत्या. किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्यानं उपचार सुरू होते अशाही चर्चा समोर येत होती. शुक्रवारी तब्बल 21 दिवसांनंतर किम जोंग उन सर्वांसमोर आले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार 21 दिवसांनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते पहिल्यांदा दिसले.

गेल्या काही दिवसांपासून किम जोंग कुठे आहेत याबाबत उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या. किम जोंग यांच्यावरची शस्त्रक्रिया अयशस्वी झाली आणि ते कोमात गेले असल्याची चर्चा होती. त्यांच्या प्रकृतीबाब या देशाने अद्याप याबाबत कुठलंही अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. किम जोंग उन कदाचित जिवंत नसावेत, अशाही वावड्या उठल्या होत्या. मात्र शुक्रवारी एका समारंभात कारखान्याचं उद्घाटन करताना दिसल्यानं या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हे वाचा-अमेरिकेत अडकला मुलगा, भारतात आईवर करायचे आहेत अंत्यसंस्कार पण...

KCNAने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. तरीही एक प्रश्न अनुत्तरीत राहातोच. किम जोंग यांना नेमकं काय झालं होतं? 20 दिवस ते कुठे होते आणि त्यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप का समोर आली नाही? 11 एप्रिल रोजी जनतेसमोर ते आले होते त्यानंतर ते गायब झाले आणि 1 मे रोजी उद्घाटन सोहळ्यात दिसले.

हे वाचा-Lockdown: बायको आणि 1 वर्षाच्या मुलाला घेत चालवली 750 किमी सायकल, पण...

हे वाचा-Lockdown 3.0 : दारु दुकाने आणि पान टपऱ्यांसाठी 'अशी' आहे सूट

संकलन, संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 2, 2020, 7:06 AM IST

ताज्या बातम्या