केएफसी लवकरच आणणार 'व्हेज चिकन'

केएफसी लवकरच आणणार 'व्हेज चिकन'

  • Share this:

न्यूयॉर्क, 11 जून : लज्जदार चिकनसाठी प्रसिद्ध असलेल्या केएफसीने आता एक अभिनव घोषणा केलीये. केएफसी लवकरच व्हेज फ्राइड चिकन आणणार आहे.

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फिंगर लिकिन आणि चिकनसाठी लोकप्रिय केएफसी ब्रिटेनमध्ये आपल्या स्टोरमध्ये शाकाहारी मेन्यू ठेवणार आहे. 2019 पर्यंत हा शाकाहारी मेनू पाहण्यास मिळणार आहे.

केंचुकी फ्राइड चिकनचे शेफ व्हेज डिशसाठी रेसिपी तयार करत आहे. हे आमच्यासाठी टाॅप सिक्रेट आहे. आम्ही अनेक प्रकारच्या टेस्ट करत आहोत. जर सगळं काही व्यवस्थितीत राहिलं तर 2019 प्रयत्न तुम्हाला व्हेज चिकनची चव चाखायला मिळणार अशी माहिती केएफसीच्या प्रवक्त्याने दिली.

शाकाहारी ग्राहक टार्गेट

शाकाहारी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी केएफसीचा हा प्रयत्न असणार आहे. अहवालानुसार, केएफसी आपल्या खाण्यात कॅलरी कमी करत आहे. व्हेजचा पर्यायही हा कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न आहे. एवढंच नाहीतर केएफसी शाकाहारी पदार्थ सुद्धा आणणार आहे. यात पनीर आणि सोयाबिनच्या पदार्थांचा समावेश आहे.

याआधीही मॅकडाॅनल्डने आपल्या रेस्टाॅरेंटमध्ये सोयाबिनपासून मॅकवेगन बर्गर आणला होता. हे स्वीडन आणि फिनलँडमधील ग्राहकांसमोर सादर केलं होतं.

First published: June 11, 2018, 10:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading