भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

भयंकर! भुकेल्या लेकरांचं सांत्वन करण्यासाठी आईनं चुलीवर दगड ठेवला उकळत आणि...

आपल्या मुलांसाठी कायम काबाड कष्ट करणाऱ्या माऊलीवर पाहा काय वेळ आली. अंगावर काटा आणणाऱ्या मायेची कहाणी.

  • Share this:

मोम्बासा काउंटी, 02 मे : कोरोनाव्हायरस सध्या लोकांच्या आयुष्यातील शोकांतिका बनली आहे. दररोज लाखो लोकं कोरोनामुळं मरत आहेत किंवा भुकेनं. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं लोकांना दोन वेळचं अन्नही मिळेनासं झालं आहे. कोरोनापेक्षा जास्त आता लोकं उपासमारीनं मरण्याची शक्यता जास्त आहे. असाच एक भयंकर प्रकार केनियामध्ये घडला.

केनियाच्या मोम्बासा काउंटीमधील कसौनी येथे सगळ्यात जास्त कुपोषणाचे प्रमाण मानले जाते. आता कोरोनामुळं येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मुलांना दोन वेळचं अन्न मिळावं, म्हणून काबाड कष्ट करणाऱ्या आईवर पोरांच्या सांत्वनासाठी खोटेपणा करावा लागला. मुलांना प्रचंड भूक लागलेली असातान त्याचं सांत्वन करण्यासाठी या आईनं चक्क दगड उकळत ठेवला. आई जेवण करतेय असं समजून डोळ्या वेळानं तिची मुलं उपाशीच निजून देली.

केनियामध्ये राहणाऱ्या पेन्निहा किताओ ही आठ मुलांची आई आहे. पतीच्या हत्येनंतर ती एकटीच घरी सांभाळते. पेन्निहा केनियन्स.कॉम या वेबसाइटला सांगितले की, ती आपल्या मुलांसमोर दगड उकळवून जेवण बनवण्याचा नाटक करीत होती जेणेकरून ते शांत होतील आणि काही थोड्यावेळानं झोपतील.

वाचा-'...तर इथेच जीव द्यावा लागेल', 2500 किमी लांब अडकलेल्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पेन्निहा म्हणाली की, मुले सतत रडत आहेत आणि त्यांना झोपही येत नाही. म्हणून मी ही युक्ती वापरुन पाहिली. मुलांना काहीतरी स्वयंपाक होत आहे असे वाटेल आणि वाट पाहत झोपी जाईल या आशेवर मी दोनदा दगड उकळले. मात्र पेन्निहाची ही युक्ती फार काळ चालली नाही. पन्निहा म्हणाली, दुसर्‍या दिवशी जेव्हा मी मुलांसाठी दगड उकळण्यासाठी बसले, तेव्हा मध्यरात्री मुलं उठली. माझ्या एका मुलाने मला सांगितले की, मी त्यांच्याशी खोटे बोलत आहे हे त्यांना कळलं आहे.

वाचा-VIDEO : रिअल लाइफ हीरो! 84 तास ड्रायव्हिंग करत 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह

पेन्निहासाठी सध्या सोशल मीडियावर सर्व स्थरातून मदत मागितली जात आहे. पेन्निहाच्या शेजारी राहणाऱ्या प्रिस्कानं आपल्या मित्राच्या मदतीनं पेन्निहाची मदत गोळा करण्याचे ठरवले. काही दिवसांपूर्वी पेन्निहा आजारी पडली  होती, त्यावेळी त्यांच्या घरात कमवतं दुसरं कोणी नसल्यामुळं मुलांना उपाशीच राहावे लागले होते.

वाचा-32 दिवस व्हेंटिलेटरवर होता पती, फक्त 3 तास पत्नीला भेटला अन् घडला चमत्कार

2019मध्ये पेन्निहाच्या घरावर चोरट्यांनी हल्ला करुन तिच्या पतीची हत्या केली. त्यावेळी ती दोन महिन्यांपासून गरोदर होती. अशा परिस्थितीत पेन्निहाने कपडे धुण्याचे काम सुरू केले. परंतु देशात कोरोना विषाणूची पहिली घटना समोर आल्यानंतरच सर्व काही बदलले. केनियामध्ये कोरोना संकटाच्या सर्व कुटुंबांना दोन वेळचं जेवणं मिळणं कठीण झालं आहे.

वाचा-मुंबईहून 1600 किमी चालत गाठलं घर, क्वारंटाइन केल्यानंतर 6 तासांतच...

First published: May 2, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या