Home /News /videsh /

लॉकडाऊनमध्ये बाल्कनीत उभा राहिला 13 वर्षांचा मुलगा, पोलिसांच्या गोळीबारात झाला ठार

लॉकडाऊनमध्ये बाल्कनीत उभा राहिला 13 वर्षांचा मुलगा, पोलिसांच्या गोळीबारात झाला ठार

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत असताना घराच्या बाल्कनीत उभा राहिलेल्या कुटुंबावर पोलिसांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना केनियामध्ये घडली.

    नैरोबी, 29 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही लोक घराबाहेर पडत असल्याचंही दिसतं. आता केनियामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत असताना पोलिसांनी चक्क एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. यामुळे घराच्या बाल्कनीत उभा असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, हुसैन मोयो हे त्यांच्या घरच्या लोकांसह बाल्कनीत उभे होते. तेव्हा घराजवळूनच जाणाऱ्या पोलिसांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. तेव्हा त्यांचा 13 वर्षांचा मुलगा यासीन याच्या पोटाला गोळी लागली. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. गोळी लागल्यानंतर त्याला रुग्णालयात न्यायच्यावेळीही पोलिसांनी ऐकलं नाही. यासीनचे वडील म्हणाले की, मुलाला गोळी लागली आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलिसांकडे तासभर विनवणी केली. मात्र कर्फ्यू असल्यानं तेही करू दिले नाही. आम्ही बाल्कनीत उभा होतो. कर्फ्यूचं उल्लंघनही केलं नव्हतं तरीही पोलिसांनी गोळीबार केला असंही यासीनच्या वडिलांनी म्हटलं. केनियामध्ये कर्फ्यू लागल्यानंतर आतापर्यंत पोलिसांच्या गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अॅमनेस्टी इंटरनॅशनलचे केनियाचे संचालक म्हणाले की, लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिस बळाचा वापर जास्त करत आहेत. यामुळे लोक दहशतीखाली आहेत. हे वाचा : लॉकडाऊनमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांच्या अशा वर्तनामुळे भीतीचं वातावऱण निर्माण होत आहे. सोशल मीडियावरही याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी मात्र लोक क्वारंटाइनचे नियम पाळत नसल्याचं आणि पोलिसांवरच हल्ला केला जात असल्याचं म्हटलं आहे. हे वाचा : लॉकडाऊन करूनही चीन, इटलीला जमलं नाही ते भारताने केलं, 30 दिवसांत काय झालं? संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या