शाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

केट आणि प्रिन्स विलियमचं हे तिसरं अपत्य आहे. या आधी या शाही जोडप्याला प्रिंन्स जॉर्ज हा सहा वर्षाचा मुलगा तर शारलेट ही २ वर्षांची मुलगी आहे.

Sonali Deshpande | Updated On: Apr 25, 2018 04:24 PM IST

शाही जोडप्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

24 एप्रिल : ब्रिटनच्या राजघराण्यात सध्या मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांच्या लग्नाच्या चर्चांसोबतच आणखी एक आनंदाची लहर पाहायला मिळतेय. त्या आनंदाचं निमित्त ठरलाय तो म्हणजे या राजघराण्यात आलेला नवा पाहुणा. डचेस ऑफ केंब्रिज म्हणजेच केट मिडलटन यांनी सोमवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

केट आणि प्रिन्स विलियमचं हे तिसरं अपत्य आहे. या आधी या शाही जोडप्याला प्रिंन्स जॉर्ज हा सहा वर्षाचा मुलगा तर शारलेट ही २ वर्षांची मुलगी आहे.नवजात शिशू हा राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा सहावा पणतू असून, राजघराण्याचा पाचवा वारस आहे.

केट यांनी बालकाला जन्म दिल्यानंतर जवळपास सात तासांनी त्या सेंट मेरी रुग्णालयातून प्रिंस विलियम यांच्यासोबत माध्यमांसमोर आल्या. यावेळी पांढऱ्या रंगाच्या एका लोकरी ब्लँकेटमध्ये केट यांनी राजघराण्यातील नव्या पाहुण्याला मोठ्या प्रेमानं कवेत घेतलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close