कराची, 29 जून : पाकिस्तानच्या (Pakistan) कराची स्टॉक एक्सचेंजवर दहशतवाद्यांनी (Karachi Stock Exchange)ग्रेनेड हल्ला केला आहे. ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी (Terrorist Attack) अजूनही स्टॉक एक्स्चेंजच्या आतच आहेत. एक्सचेंजमध्ये अजूनही 1 दहशतवादी गोळीबार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार 3 दहशतवादी ठार झाले असून 3 लोक जखमीही झाले आहेत.
पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्सचेंजवर सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे. चार दहशवादी घुसले असून तीन जहशतवादी ठार झाले आहेत तर दोन कर्मचार्यांचा मृत्यूही झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आणि रेंजर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अद्यापही चकमक सुरू आहे.
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर इमारतीत अडकलेल्या लोकांना मागील बाजूला असणाऱ्या दरवाजाने बाहेर काढलं जात आहे.
Karachi stock exchange under attack from terrorist..Many casualties reported..#terrorists #Karachi pic.twitter.com/hzdQVQf7wa
— #Pravin Joshi 🇮🇳 (@PravinJ80729060) June 29, 2020
Strongly condemn the attack on PSX aimed at tarnishing our relentless war on terror. Have instructed the IG & security agencies to ensure that the perpetrators are caught alive & their handlers are accorded exemplary punishments. We shall protect Sindh at all costs.
— Imran Ismail (@ImranIsmailPTI) June 29, 2020
स्टॉक एक्सचेंज खुलतास झाला हल्ला
मीडिया रिपोर्टनुसार, कराची स्टॉक एक्सचेंज सकाळी 10.30 वाजता उघडतं. आजही रोजच्या वेळेत सुरू झालं. याचवेळी सर्वसामान्य लोकं आणि कर्मचारी दाखल होताच दहशतवादीही तिथे पोहोचले. क्षणात घटनास्थळी पळापळ सुरू झाली. तात्काळ याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
दहशतवाद्यांची पोलिसांचा गणवेश घातला होता. एका वाहनातून आलेल्या या दहशतवाद्यांनी पार्किंगमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्यांनी शेअर बाजारावर हल्ला केला. दोन दहशतवादी प्रवेशद्वारावरच ठार झाले. तर, दोनजणांनी इमारतीत घुसखोरी केली. मात्र, मोठा घातपात करण्याआधी त्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan media