नवऱ्याच्या तिसऱ्या लग्नात पोहोचली पहिली बायको, मंडपातच पतीला धू धू धुतलं!

नवऱ्याच्या तिसऱ्या लग्नात पोहोचली पहिली बायको, मंडपातच पतीला धू धू धुतलं!

तिसरं लग्न करणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोने लग्नाच्या मंडपामध्ये घुसून त्याला मारहाण केली आहे. लग्नाचे विधी सुरु असताना पहिली बायको जबरदस्तीने मंडपात घुसली आणि नवऱ्याला प्रचंड मारहाण केली.

  • Share this:

कराची, 13 फेब्रुवारी : तिसरं लग्न करणाऱ्या नवऱ्याला त्याच्या पहिल्या बायकोने लग्नाच्या मंडपामध्ये घुसून त्याला मारहाण केली आहे. लग्नाचे विधी सुरु असताना पहिली बायको जबरदस्तीने मंडपात घुसली आणि नवऱ्याला प्रचंड मारहाण केली. दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. मारहाण झालेला संतप्त नवरा पहिल्या बायकोविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. या नवऱ्याने पहिल्या पत्नीविरोधात लग्न मंडपात जबरदस्तीने घुसल्यामुळे आणि मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्याचं कोणतही कारण या घटनेत नव्हतं. पोलिसांकडून घटनेबाबत आणखी तपास सुरु आहे.

पाकिस्तानातील कराची याठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या मारहाणीत नवरोबा जबर जखमी झाला आहे आणि तो हल्लेखोर पूर्वपत्नीविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत आहे. याकरता त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. ‘पहिल्या बायकोबरोबर आता माझा काहीही संबंध नाही आहे. याप्रकरणाबाबत मी वकिलांशी बोलून तिला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.’ अशी प्रतिक्रिया त्याने स्थानिक मीडियाला दिली आहे.

मात्र त्याच्या पहिल्या बायकोने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार तिच्या नवऱ्याने 2018 मध्ये देखील सर्वांपासून लपवून दुसरं लग्न केलं होतं. आता तो त्याचप्रकारे तिसरं लग्न करण्यासाठी बोहल्यावर चढला पण रंगेहात पकडला गेला, असंही ती म्हणाली. पाकिस्तानातील कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीची लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे. आता हे प्रकरण मिटवण्यासाठी दिवाणी न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

अन्य बातम्या

‘बघ मी आत्महत्या करतोय’, पतीने फेसबुक LIVE करत संपवलं जीवन

काय डोकं आहे राव! तस्करीसाठी शेंगदाण्यात लपवल्या 45 लाखांच्या नोटा आणि...

Photo : रणथंबोरमध्ये मादी अस्वलाची वाघासोबत झटापट, वाघाचीच उडाली भंबेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2020 02:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading