Home /News /videsh /

पाकिस्तानमध्ये सिविल वॉर? पोलिसांचे सैन्याविरुद्ध बंड; गोळीबारात 10 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यूचा दावा

पाकिस्तानमध्ये सिविल वॉर? पोलिसांचे सैन्याविरुद्ध बंड; गोळीबारात 10 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यूचा दावा

पाकिस्तानात बंडखोरी पसरली असून सिंध पोलीस विरुद्ध सेना आणि आयएसआयची लढाई सुरू झाली आहे.

    कराची, 21 ऑक्टोबर : पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंसक वातावरण आहे. पोलीस आणि पाक लष्कर एकमेकांसमोर उभे राहिले आहे. लष्करानं पोलीस स्टेशन ताब्यात घेतले असून या हिंसाचारात आतापर्यंत 10 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हे प्रकरण तापल्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे जावई मोहम्मद सफदर यांना पूर्व कराचीमधून अटक करण्यात आली होती. सफदर इम्रान खान सरकारविरुद्ध मोर्चा करत होता. दरम्यान काही वेळानंतर सफदर यांची सुटका करण्यात आली. मात्र यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मंगळवारी आदेश दिला की मोहम्मद सफदर यांना का अटक केली गेली आणि कोणत्या परिस्थितीत केली याचा तपास करावा. सफदर यांच्यावर मार्चा दरम्यान हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केल्याचा आरोप आहे. या अटकेनंतर बरीच खळबळ उडाली होती, आता सैन्य याची चौकशी करेल. दुसरीकडे आता पाक लष्कर विरुद्ध पोलीस असे चित्र उभे राहिले आहे. याआधी पाकिस्तानात बंडखोरी पसरली असून सिंध पोलीस विरुद्ध सेना आणि आयएसआयची लढाई सुरू झाली आहे. सिंध पोलिसांचे म्हणणे आहे की मोहम्मद सफदर यांना त्यांच्या नकळत अटक केली गेली आणि जेव्हा ही अटक झाली तेव्हा सिंध पोलीस प्रमुखांना घेरण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने सफदर यांना अटक केली. यानंतर सिंध पोलिसांच्या आयजीने रजेवर जाण्याची घोषणा केली, यामुळे हजारो सिंध पोलीस कर्मचारी रजेवर गेले आणि काहीजण ड्युटीवर गेले नाहीत. पाकिस्तानमध्ये सिविल वॉर सुरू असल्याच्या चर्चा आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये आहेत. दरम्यान, या परिस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. या दबावाखाली अखेरीस लष्कराला सफदरच्या अटकेच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले. सरकारनं सिंध पोलिसांनी अपील करून सुट्टी मागे घेण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमधील इम्रान सरकारविरूद्ध बंडखोरीचा सूर तीव्र होत आहे आणि विरोधी पक्ष सतत सभा घेत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Imran khan, Pakistan army

    पुढील बातम्या