कल्पना चावला शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाता येणार

त्या परिक्षेतल्या विजेत्यांना नासाची सफर घडवली जाणार आहे. त्याचबरोबर इतर पुरस्कार विजेत्यांना विविध पुरस्कारही दिले जाणार आहेत. स्टेट, सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डातल्या 5 ते 9 वीच्या विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र असतील.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2017 07:49 PM IST

कल्पना चावला शिष्यवृत्ती परीक्षेअंतर्गत विद्यार्थ्यांना ‘नासा’ला जाता येणार

03 डिसेंबर:  अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला भेट देण्याची प्रत्येक विद्यार्थ्याची इच्छा असते. पण ते प्रत्येकालाच काही शक्य होत नाही. पुण्यातल्या एका संस्थेनं ही संधी प्राप्त करून दिलीय.

ऑनलाईन शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या http://educharya.com या संस्थेनं कल्पना चावलांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांची घोषणा केली आहे.  त्या परिक्षेतल्या विजेत्यांना नासाची सफर घडवली जाणार आहे. त्याचबरोबर इतर पुरस्कार विजेत्यांना विविध पुरस्कारही दिले जाणार आहेत. स्टेट, सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डातल्या 5 ते 9 वीच्या विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र असतील.  परिक्षेसाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार  नाही. एड्युचर्याच्या वेबसाईटवर यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या परिक्षेचं नाव कल्पना चावला राष्ट्रीय स्कॉलर परिक्षा आहे.

तेव्हा आता शालेय विद्यार्थ्यांना नासाला जाता  येणंं शक्य होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...