मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

आत्मघाती हल्ल्यानंतर ISIS रॉकेटद्वारे काबूल विमानतळाला करू शकतं टार्गेट; अमेरिकेचा खळबळजनक दावा

आत्मघाती हल्ल्यानंतर ISIS रॉकेटद्वारे काबूल विमानतळाला करू शकतं टार्गेट; अमेरिकेचा खळबळजनक दावा

गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे.

गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे.

Afghanistan Crisis: गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे. या हल्ल्यानंतर अफगाण पत्रकारांकडून जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत डजनभर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं आहे.

    काबूल, 27 ऑगस्ट: तालिबान संघटनेनं अफगाणिस्तानवर ताबा (Taliban Control Taliban) मिळवल्यानंतर देशातील परिस्थिती अधिक चिघळत आहे. यानंतर आता जागतिक स्तरावरील आतंकवादी संघटना ISISनंही अफगाणिस्तानात डोकं वर काढलं आहे. इसिसनं काबूल विमानतळ परिसरात गुरुवारी सायंकाळी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शेकडो लोकांचा हकनाक बळी गेला आहे. या हल्ल्यानंतर अफगाण पत्रकारांकडून जारी करण्यात आलेल्या एका व्हिडीओत डजनभर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं आहे. या हल्ल्यानंतर काबूल विमानतळावर आणखी एक भयंकर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या काळात इसिस काबूल विमानतळावर रॉकेटद्वारे हल्ला करणार असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे जागतिक राजकारणात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी झालेल्या हल्ल्यात एकूण 73 लोकांचा जीव गेला आहे. ज्यामध्ये 13 अमेरिकी सैन्यांसह 28 तालिबान बंडखोरांचा देखील समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. हेही वाचा-''आम्ही देवाचे आभार मानतो...'', काबूल स्फोटातून थोडक्यात बचावले 160 शीख, हिंदू इस्लामिक स्टेटनं (Islamic State) सांगितलं की, त्यांच्या आत्मघाती हल्लेखोरानं अमेरिकन लष्करासोबत काम करणाऱ्या भाषांतरकार आणि त्यांच्या साथीदारांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेनंही या हल्ल्यासाठी इसिसला जबाबदार धरलं आहे. तसेच अद्याप काबूलवरील धोका टळला नसून ISIS रॉकेट किंवा स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे काबूल विमानतळावर हल्ला करू शकतो, असा दावा केला आहे. संबंधित गुप्त माहिती तालिबानकडून मिळाली असल्याचंही अमेरिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यासाठी अमेरिकन कमांडोजना अलर्ट राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हेही वाचा-अमेरिकेचा इशारा ठरला खरा, ''किंमत मोजावी लागेल''; जो बायडेन भडकले गुरुवारी झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी तीव्र निषेध केला आहे. तसेच या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नसून त्यांना याची किंमत मोजावी लागेल अशा इशारा जो बायडेन यांनी दिला आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या जो बिडेन यांनी म्हटलं की, आम्ही ही गोष्ट विसरणार नाही आणि आम्ही माफही करणार नाही. आता आम्ही शिकार करू आणि त्यांना या मृत्यूंची किंमत मोजावी लागेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Afghanistan, America, Taliban

    पुढील बातम्या