मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

गर्दीमुळे वाढलेला उकाडा टाळण्यासाठी ओढ्यात उभे होते; क्षणार्धात स्फोट झाला आणि लाल रंग तरंगला

गर्दीमुळे वाढलेला उकाडा टाळण्यासाठी ओढ्यात उभे होते; क्षणार्धात स्फोट झाला आणि लाल रंग तरंगला

एका क्षणात ओढ्यात रक्ताचा रंग तरंगू लागला. काबुल विमानतळ स्फोटाचा सर्वांत भीषण video

एका क्षणात ओढ्यात रक्ताचा रंग तरंगू लागला. काबुल विमानतळ स्फोटाचा सर्वांत भीषण video

काबुल विमानतळाजवळचा एक सर्वांत भीषण व्हिडिओ (Kabul Airport blast video) सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. एका क्षणात मृतदेहांचा खच झाला आणि ओढ्यात रक्ताचा रंग तरंगू लागला....

    काबुल, 27 ऑगस्ट : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधल्या हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आत्मघातकी बॉम्ब हल्ले (Kabul Airport Blasts) झाले आहेत. या हल्ल्यातल्या मृतांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये 105 जणांचा म़ृत्यू (Kabul Airport death toll) झाला आहे. तब्बल 1,138 जण जखमी (Kabul Airport Suicide bombing) झाले आहेत. या सगळ्यातच विमानतळाजवळचा एक व्हिडिओ (Kabul Airport blast video) सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे. एका छोट्या ओढ्यात अडकलेले नागरिक एकमेकांना मदत करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या ओढ्यातलं पाणी मृतांच्या रक्तामुळे अगदी लाल झालंय (Kabul airport pool of blood). तसंच, या ओढ्यात मृतदेहांचा खच पडल्याचंही दिसत आहे. Kabul Airport Blast: 'मानवी अवयव हवेत उडत होते..', अंगावर काटा आणणारा अनुभव ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्याने असा दावा केला आहे, की हा व्हिडिओ काबूल विमानतळावरच्या हल्ल्यानंतरचा (Kabul Airport red lake) आहे. News18Lokmat ने या VIDEO ची सत्यता पडताळलेली नाही. काबुल स्फोटात कित्येकांचं संपूर्ण कुटुंबच या हल्ल्यात मारलं गेलं. तसंच, विमानतळाजवळ कित्येक मृतदेह बेवारस आहेत. साधारणपणे बेवारस मृतदेहांवर प्रशासन अंत्यसंस्कार करतं; मात्र अफगाणिस्तानमध्ये आता प्रशासनच उरलं नसल्यामुळे या मृतदेहांचं काय होईल, याची कोणालाच कल्पना नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळावर आश्रय घेतलेले नागरिक उकाड्यापासून वाचण्यासाठी या ओढ्याच्या (Kabul Airport IS attack) पाण्यात उभे होते. तेवढ्यात एका हल्लेखोराने केलेल्या हल्ल्यात या सर्वांचा मृत्यू झाला आणि बघता बघता होत्याचं नव्हतं झालं. हे नागरिक या ठिकाणी विमानातून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी थांबले होते; मात्र त्यांना अॅम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेण्याची वेळ आली. भारताने उभारलेल्या अफगाणी संसदेचं रूपांतर इस्लामी 'शूरा'मध्ये होणार की काय? आयसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या ‘आयसिस-के’ने (ISIS-K) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अमेरिकी सैन्यावर आणि त्यांना साथ देणाऱ्या अफगाण सैन्यावर (Attack on American army) आपण हल्ला केल्याचं ते म्हणाले. त्यांनी आपल्या स्टेटमेंटसोबत हल्लेखोराचा फोटोही प्रसिद्ध केला. या फोटोमध्ये हल्लेखोर आयसिसच्या (IS) काळ्या झेंड्यासमोर बॉम्ब लावलेला बेल्ट घालून उभा असल्याचं दिसत आहे. त्याचा चेहरा झाकला असून, त्याचे केवळ डोळेच दिसत आहेत; मात्र या स्टेटमेंटमध्ये दुसरा आत्मघातकी हल्लेखोर किंवा बंदूकधारी हल्लेखोरांचा उल्लेख नव्हता. या दाव्याची सत्यता पडताळता आली नाही. Explainer: अफगाणिस्तानातून सुटकेच्या भारतीय मोहिमेचा दुर्गा मातेशी असा आहे संबंध या हल्ल्यात अमेरिकेच्या 13 सैनिकांचा (America soldiers died) मृत्यू झाला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकी नागरिकांना मायदेशी आणण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासोबतच, ‘आम्ही हल्लेखोरांना माफ करणार नाही. आम्ही हा हल्ला विसरणार नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाला आम्ही शोधून मारू. तुम्हाला याची किंमत चुकवावी लागेल’ असा इशाराही (Biden on Kabul Airport attack) बायडेन यांनी हल्लेखोरांना दिला आहे.
    First published:

    Tags: Afghanistan, Kabul, Taliban

    पुढील बातम्या