• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • Kabul Suicide Attack : विमानतळावर आत्मघातकी हल्ल्याचा पहिला VIDEO आला समोर; 60 जणांचा मृत्यू

Kabul Suicide Attack : विमानतळावर आत्मघातकी हल्ल्याचा पहिला VIDEO आला समोर; 60 जणांचा मृत्यू

स्थानिक पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंवरून हा हल्ला किती भयंकर होता याची कल्पना येईल. हा हल्ला आत्मघातकी पथकाने (Kabul airport suicide attack) केल्याचं सांगितलं जात आहे.

  • Share this:
    काबूल, 26 ऑगस्ट: तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan crisis latest news) ताबा मिळवल्यानंतर अनेक अफगाणी नागरिक आणि परदेशी नागरिक देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर गर्दी करत आहेत. त्यातच विमानतळाजवळ भीषण स्फोट (Blast outside Kabul Airport) झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंवरून हा हल्ला किती भयंकर होता याची कल्पना येईल. हा हल्ला आत्मघातकी पथकाने (Kabul airport suicide attack) केल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेच्या पेंटॅगॉनने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण अद्याप किती नुकसान झालं याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. BBC ने दिलेल्या वृत्तानुसार, किमान 60 जण या स्फोटात ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं ते सांगत आहेत. Twitter वर काही स्थानिक पत्रकारांनी हल्ल्यानंतरची परिस्थिती दाखवणारे फोटोही शेअर केले आहेत. या हल्ल्यात अमेरिकेचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे. काही अमेरिकन सैनिक या हल्ल्यात जखमी झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानबद्दल बोलताना सांगितलं की, भारताचं पहिलं प्राधान्य तिथे अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका हे आहे. पण या ताज्या घडामोडींमुळे भारतीय विमान सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नियमित विमान (Flights to Kabul) उड्डाणामुळे क्रू आणि प्रवासी दोघांनाही धोका असण्याची शक्यता आहे, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेने आज काबूल एटीसी (Air traffic control)सोडलं. त्यानंतर भारतातून आणखी काही विमानाचं उड्डाण करणं अवघड आहे. गुरुवारी शेवटच्या रेस्क्यूनंतर पुढील आदेश येईपर्यंत भारतीय उड्डाणे निलंबित राहतील.
    First published: