• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • ''आम्ही दहशतवाद्यांना माफ करणार नाही, याची किंमत मोजावी लागेल''; जो बायडेन संतापले, अमेरिकेचा इशारा ठरला खरा

''आम्ही दहशतवाद्यांना माफ करणार नाही, याची किंमत मोजावी लागेल''; जो बायडेन संतापले, अमेरिकेचा इशारा ठरला खरा

Kabul Airport Attack: स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.

 • Share this:
  वॉश्गिंटन, 27 ऑगस्ट: Kabul Airport Explosion: अफगाणिस्तानच्या (Afghanistan)काबुल विमानतळावर (kabul airport explosion) झालेल्या स्फोटांमुळे 90 जणांचा (Kabul Airport Blast Death) मृत्यू झाला असून 150 हून अधिक जण जखमी झालेत. तालिबानने या स्फोटांचा निषेध केला आहे. या स्फोटांची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे. गुरुवारी अमेरिकेनं नागरिकांना काबूल विमानतळावर हल्ला होण्याचा धोका असून विमानतळापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.दरम्यान अमेरिकेचा इशारा खरा ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीही या हल्लाचा तीव्र निषेध केला आहे. (Several US service members killed in Kabul airport attack) या दहशतवाद्यांना आम्ही माफ करणार नसून त्यांना याची किंमत चुकवावी लागेल अशा इशारा जो बायडेन यांनी दिला आहे. या हल्ल्यात अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या जो बिडेन यांनी म्हटलं की, आम्ही ही गोष्ट विसरणार नाही आणि आम्ही माफ ही करणार नाही. आता आम्ही शिकार करू आणि त्यांना या मृत्यूंची किंमत मोजावी लागेल. यासह बायडेन म्हणाले की, आम्ही अफगाणिस्तानातल्या अमेरिकन नागरिकांना वाचवू. कमीत कमी एक हजार अमेरिकन आणि इतर अन्य अफगाणी अजूनही काबूलमधून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत आहेत. भावूक झाले President Biden 'मिरर'च्या वृत्तानुसार, गुरुवारी काबूल विमानतळावर एकापाठोपाठ तीन स्फोट झाले. या हल्ल्यात 13 अमेरिकन कमांडोंसह 90 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जो बिडेन यांनी काबूल हल्ल्यानंतर देशाला संबोधित करताना इसिसचा बदला घेण्याची शपथ घेतली. यादरम्यान ते भावूकही झाले. त्यांनी सर्वप्रथम शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली, त्यानंतर दहशतवादी संघटनेच्या विरोधात मोहीम जाहीर केली. ISIS-K नं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी ISIS-K (आयएसआयएस-खुरासाना) या दहशतवादी गटाने आपल्या टेलिग्राम अकाऊंटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचं जाहीर केलं. गुरुवारी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर दोन स्फोटांनंतर काबूलमधील अमेरिकी दूतावासाने अमेरिकी नागरिकांना विमानाचा प्रवास टाळण्यासाठी आणि विमानतळावरील गेट टाळण्यासाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: