News18 Lokmat

लंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक

एका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे जुनैद आणि झाकरीया यांनी त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2018 01:27 PM IST

लंडनमध्ये मारहाण केल्याप्रकरणी नवाज शरीफ यांच्या नातवंडांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातवाला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी लंडनमध्ये नवाज शरिफ यांचा निषेध करण्यासाठी काही लोक जमा झाले होते. त्यातील एका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे जुनैद आणि झाकरीया यांनी त्या व्यक्तीची कॉलर पकडून त्याला मारहाण केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही नातवंडांना ताब्यात घेतले आहे. जमावाने आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे जुनैदने पोलिसांना सांगितले. जुनैद हा शरीफ यांची मुलगी मरियमचा मुलगा आहे तर झाकरीया हा शरीफ यांच्या मुलाचा हुसैनचा मुलगा आहे.

Loading...

पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना भ्रष्टाचारात दोषी मानण्यात आले आहे. शरीफ यांना एवेन फील्ड रेसरेन्स प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर मुलगी मरियमला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज शरीफ आणि मरियम लंडनहून पाकिस्तानात यायला रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी नवाज शरिफ आणि मरियम यांना अबु धाबी विमानतळावर अटक होणार आहे. तेथून त्यांना लाहोरला आणण्यात येणार आहे.

नवाज यांना सुमारे ७३ कोटी रुपये आणि मरियम यांना सुमारे १८.२ कोटी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात नॅशनल अकाऊंटिबिलीटी ब्यूरो (एनएबी) ने तीन प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांमध्ये एवेनफील्ड प्रॉपर्टीज, गल्फ स्टील मिल्स आणि अल- अजीजा स्टील मिल्स प्रकरणाशी निगडीत गुन्ह दाखल आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...