News18 Lokmat

ऑक्सफर्ड डिक्शनरीत 'जुगाड'

यावेळी जुगाड या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 10:13 AM IST

ऑक्सफर्ड डिक्शनरीत 'जुगाड'

30 ऑक्टोबर: ऑक्सफर्ड डिक्शनरीत सातत्यानं जगभरातल्या प्रादेशिक भाषांमधल्या शब्दांचा समावेश होत असतो. यात भारतही कुठे मागे नाही . यावेळी जुगाड या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे.

उत्तर भारतातील बोली हिंदीतला हा एक प्रचलित शब्द आहे. गेल्या काही वर्षांपासून इंग्लिश बोलतानाही या शब्दाचा वापर करण्यात येतो आहे. आता या शब्दाला थेट ऑक्सफर्ड डिक्शनरीत स्थाम मिळाले आहे. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी शक्कल लढवून वेळेवर केलेली जमवाजमव, असं जुगाडचं वर्णन करता येईल. त्याचप्रमाणे, गुलाबजाम, वडा, बापू आणि दादागिरी हे शब्दही ऑक्सफर्डसारख्या प्रतिष्ठित डिक्शनरीत विराजमान झालेत.

याआधी महाराजा, मंत्रा, गुरू असे शब्द ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 10:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...