Home /News /videsh /

26/11चा मास्टरमाईंड हाफीज सईद म्हणे निर्दोष, पाकिस्तानने पुन्हा मारली पलटी

26/11चा मास्टरमाईंड हाफीज सईद म्हणे निर्दोष, पाकिस्तानने पुन्हा मारली पलटी

आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांनी त्याला अटक केली होती. मात्र ही अटक केवळ नाटक होतं हेच आता सिद्ध झालंय.

    इस्लामाबाद 14 जानेवारी : जमात-उद-दावाचा (Jamaat-ud-Dawa) प्रमुख हाफिज सईद (Hafiz Saeed) हा निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र पाकिस्तानच्या (Pakistan) अधिकाऱ्यांनी दिलं आहे. पाकिस्तानच्या कोर्टात (Pakistan Court) हाफिज विरुद्ध दहशतवाद्यांना पैसे पुरविल्याचा आरोप होता. मात्र त्याच्याविरुद्ध न्यायालयात पुरावे आढळून आले नाहीत असं न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्त PTIने दिले आहेत. हाफीज सईद हा मुंबईवरच्या 26/11च्या (Mumbai Terror Attacks) हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांनी त्याला अटक केली होती. मात्र ही अटक केवळ नाटक होतं हेच यातून सिद्ध झाल्याचं भारतातल्या संरक्षण तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जमात-उद-दावा या संस्थेच्या नावाखाली हाफीज हा दहशतवाद्यांना पैसे पुरवतो असा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकेनेही त्याला दहशतवादी घोषीत केलंय. एवढं असतानाही तो पाकिस्तानात राजरोसपणे हिंडत असतो. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. भारताच्या दबावानंतर काही महिन्यांपूर्वी सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आले होते. त्याच्यावर 10 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. याच वर्षी सईदच्या जमात-उद-दावा या संघटनेकडून सुरु केलेले रावळपिंडी येथील रुग्णालय आणि मदरसा सील करण्यात आला होता. निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी देण्यासाठी मागवली केळी, काय आहे कारण? जुलै 2019 मध्ये  हाफिजला दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी सईदला अटक करण्यात आली होती. पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सईदला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मुंबई हल्ला, उरी आणि पुलवामा येथे भारतीय लष्करावर झालेले हल्ले यामागे सईदचा हात होता. VIDEO: भाजप आमदाराची दादागिर कॅमेऱ्यात कैद, शुल्लक कारणावरून शेजाऱ्याला मारलं 2009मध्ये झालेल्या टेरर फंडिंगच्या एका प्रकरणात पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाने त्याला लाहोरमधून अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सईदसह जमात-उद-दावाच्या अन्य 13 नेत्यांच्याविरुद्ध 23 खटले दाखल केले आहेत. खटले दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या अटकेची कारवाई वेगाने करण्यात आली. सईद लाहोरहून गुजरांवालाकडे जात असताना दहशतवाद विरोधी विभागाने त्याला अटक केली होती.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: JuD Chief Hafiz Saeed, Pakistan

    पुढील बातम्या