• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • हातात रॉकेट लॉन्चर आणि अंगात तालिबानी पेहराव; वाचा, जो बायडेन यांच्या गेटअपमागचं कारण

हातात रॉकेट लॉन्चर आणि अंगात तालिबानी पेहराव; वाचा, जो बायडेन यांच्या गेटअपमागचं कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचा हातात रॉकेट लॉन्चर (Rocket Launcher) घेतलेला आणि अंगात तालिबानी पेहराव (Talibani Get up) घातलेला फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.

 • Share this:
  न्यूयॉर्क, 17 सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचा हातात रॉकेट लॉन्चर (Rocket Launcher) घेतलेला आणि अंगात तालिबानी पेहराव (Talibani Get up) घातलेला फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे. हा फोटो अमेरिकेतच लावण्यात आला असून अमेरिकेतील राजकीय वर्तुळातून बायडेन यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयामुळे कोट्यवधी जनतेचे हाल होत असल्याबद्दल आता खुद्द अमेरिकन नागरिकही बायडेन यांना जबाबदार धरत आहेत. बायडेन यांच्याविरोधात कॅम्पेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या चुकीच्या निर्णयामुळेच अफगाणिस्तानच्या जनतेचे हाल होत असून महिलांवरील अत्याचारालादेखील बायडेन यांचा निर्णयच जबाबदार असल्याची टीका पेन्सिल्वेनियाचे माजी सिनेटर स्कॉट वॅगनर यांनी केली आहे. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आणि त्यामुळेच अफगाणि जनतेचे हला व्हायला सुरुवात झाल्याची चर्चा अमेरिकेत आहे. त्यासाठीच बायडेन यांच्याविरोधात 2 महिने हे कॅम्पेन चालवलं जाणार आहे. ट्रम्प आणि बायडेन यांच्यावर टीका अमेरिकेतून सैन्य माघारी घेण्याचा प्राथमिक निर्णय माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. मात्र हा निर्णय जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर थांबवू शकले असते. मात्र त्यांनी तसे न करता अफगाणिस्तानातून सैन्य माघारी बोलावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. तालिबानवर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचे सैन्य पुरेसे आहे, असं विधान बायडेन यांनी केलं होतं. मात्र प्रत्यक्षात अमेरिकेने माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. बायडेन यांचा अंदाज खोटा ठरला असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो नागरिक, महिला आणि लहान मुलांचे भवितव्य अंधारात ढकलले गेल्याचा आरोप अमेरिकेच्या जनतेतून होत आहे. हे वाचा - पाकिस्तानात अंत्यविधीवेळी नमाजादरम्यान दोन गटात गोळीबार, 8 जणांचा मृत्यू तालिबानी गेटअपमध्ये बायडेन जो बायडेन यांचा निषेध करण्यासाठी त्यांचा तालिबानी गेटअपमधील फोटो अनेक ठिकाणी लावण्यात आला आहे. त्यांना तालिबानी पेहरावदेखील फोटोत घालण्यात आला आहे. या फोटोतून जो बायडेन हेच कसे तालिबानच्या उदयाला जबाबदार आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
  Published by:desk news
  First published: