S M L

जिनपिंग आजन्म चीनचे अध्यक्ष; साम्यवादी पक्षाच्या घटनेत दुरूस्ती

या निर्णयाचं अमेरिकेने स्वागत केलं आहे. हा निर्णय चीनसाठी योग्य असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Feb 27, 2018 02:59 PM IST

जिनपिंग आजन्म चीनचे अध्यक्ष; साम्यवादी पक्षाच्या घटनेत दुरूस्ती

27 फेब्रुवारी:  चीनी साम्यवादी पक्षाच्या घटनेत महत्त्वपूर्ण दुरूस्ती करण्यात आली असून या घटनादुरूस्तीमुळे आता जिनपिंग तहहयात  चीनचे अध्यक्ष राहणार आहेत. या घटनादुरूस्तीचे  अनेकांनी स्वागत केले आहेत तर  अनेक लोकशाहीवाद्यांनी या  दुरूस्तीवर टीकेची झोड उठवली आहे.

माओ झेडाँग  या चीनच्या अध्यक्षाच्या मृत्यूनंतर  साम्यवादी पक्षाच्या घटनेत  एक कलम घालण्यात आलं होतं . या कलमानुसार  पक्षाचा अध्यक्ष हा दोनवेळाच देशाचं अध्यक्षपद भूषवू शकतो. त्यानंतर त्याला पायउतार व्हावं लागतं. जिनपिंग यांनी या कलमात बदल करत त्यासंबंधी अनेक कलम बदलली आहेत. त्यामुळे आता ते तहहयात  चीनचे अध्यक्ष किंवा ते स्वत: पायउतार होईपर्यंत हे पद भूषवतील.  या निर्णयाचं अमेरिकेने स्वागत केलं आहे. हा निर्णय चीनसाठी योग्य असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे. दुसरीकडे चिनी  माध्यमांनी या निर्णयाचं कौतूक केलं आहे. यामुळे चीनच्या प्रगतीला हातभार लागेल अशाप्रकारच्या बातम्या चीनच्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये  छापल्या गेल्या आहेत

तर दुसरीकडे हा निर्णय मुळातच लोकांसाठी घातक  आहे ,चीनची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे अशी टीका अनेक आंतरराष्ट्रीय लोकशाहीवाद्यांनी केली आहे.  या निर्णयाचे काय परिणाम होतील हे येणारा काळ ठरवेल पण माओ नंतर जिनपिंग हे सर्वात जास्त कार्यकाळ असणारे   अध्यक्ष असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 02:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close