VIDEO : भर पत्रकार परिषदेत काढून घेतले माईक, पाकिस्तानमध्ये कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी

VIDEO : भर पत्रकार परिषदेत काढून घेतले माईक, पाकिस्तानमध्ये कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी

कराचीमधल्या एका कार्यक्रमात जिब्रान नसीर पत्रकारांना संबोधित करत होते. त्याचवेळी ISI चे काही अधिकारी तिथे आले आणि त्यांनी जिब्रान नसीर यांच्यासमोरचे एकेक माइक काढून घ्यायला सुरुवात केली.

  • Share this:

कराची, 28 ऑक्टोबर : पाकिस्तानमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी केली जातेय हे दाखवणारा हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कराचीमधल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात नागरी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते जिब्रान नसीर यांचं भाषण मुस्कटदाबी करून बंद पाडण्यात आलं. कराचीमधले पोलीस अधिकारी राव अन्वर यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कारवाई केली, असा आरोप आहे.  याचा निषेध करण्यासाठी एक प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.  जगभरातले कलाकार यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या वेळी जिब्रान नसीर पत्रकारांना संबोधित करत होते. त्याचवेळी काही ISI चे अधिकारी तिथे आले आणि त्यांनी जिब्रान नसीर यांच्यासमोरचे एकेक माइक काढून घ्यायला सुरुवात केली.त्यावर जिब्रान नसीर यांनी त्यांना जाब विचारला. तुम्ही असं करू शकत नाही, असंही त्यांनी त्यांना सांगितलं. तरीही त्यांनी त्यांचं भाषण बंद पाडलं. नसीर यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

नसीर हे मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील आहेत. पाकिस्तानमधले एक धर्मनिरपेक्षवादी आणि उदारमतवादी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे.  याआधीही नसीर यांच्या कराचीमधल्या सभांमध्ये धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी व्यत्यय आणला होता.  जिब्रान नसीर यांनी 2013 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती. तेव्हा एका सभेमध्ये, त्यांनी सार्वजनिकरित्या त्यांचा धर्म जाहीर करावा, अशी मागणी एकाने केली होती.

=====================================================================================

म्हशींवरही लिहिलं 'फक्त गोकूळ उरलंय', कोल्हापुरात अजब स्पर्धा, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या